मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या विरोधात दाखल केलेल्या मानहानी दाव्याप्रकरणी मालेगाव न्यायालयात झालेल्या सुनावानीला राऊत गैरसमज हजर राहिले. तर मंत्री दादा भुसे यांनी आज न्यायालयात हजर राहून आपली साक्ष नोंदविली.
राऊत हजर राहिल्याबदल न्यायालयाने वकिला मार्फत राऊतांना समज दिली. दरम्यान खासदार संजय राऊत यांनी बाहेर वायफळ बडबड करण्यापेक्षा न्यायालयात हजर पुरावे दाखल करण्याचे आव्हान मंत्री भुसे यांनी केले. पुरावे दाखल केले नाही तर त्याच्यावर फोजदारी गुन्हा दाखल करण्याची विनंती न्यायालय करणार असल्याचे भुसे सांगितले.
गिरणा साखर कारखाना शेअर्स विक्रीमध्ये मंत्री भुसे यांनी १७८ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप राऊत यांनी दैनिक सामनामधून केला.या २ डिसेंबरला झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने राऊत यांना जमीन दिला होता. आज झालेल्या सुनावणीला राऊत पुन्हा गैरहजर राहिले.