नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लग्नाचे आमिष दाखवून यु ट्यूब चॅनलवरील कलावंत तरूणीवर निर्मात्याने बळजबरीने वेळोवेळी बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. बलात्कार करणारा हा निर्माता विवाहीत असल्याचे बिंग फुटल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात बलात्कारासह अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार विनोद उर्फ सचिन अशोक कुमावत (रा.म्हाडा कॉलनी,सातपूर) असे संशयित निर्मात्याचे नाव आहे. याप्रकरणी देवळाली गाव परिसरात राहणा-या पीडित तरूणीने फिर्याद दिली आहे. कुमावत याचे स्वतंत्र यु ट्यूब चॅनल असून, त्यात प्रदर्शित होणा-या मराठी गाण्यांमध्ये पीडित कलावंत तरूणी काम करते. गेल्या ऑगष्ट मध्ये युवती गाण्याच्या शुटींगसाठी गेली असता विवाहीत असलेल्या संशयिताने तिला लग्नाचे आमिष दाखविले. यानंतर विश्वास संपादन करीत त्याने तरूणीचे घर गाठून बलात्कार केला. तसेच नाशिकरोड भागातील लॉजिंग आणि स्व:ताच्या घरी घेवून जात मी तुझा होणारा नवरा आहे असे सांगून युवतीवर वेळोवेळी बळजबरीने अनैसर्गिक अत्याचार केला.
गेली पाच महिने हा प्रकार सुरू होता. मात्र या काळात संशयित विवाहीत असल्याचे तरूणीस कळाले. तिने निर्मात्यास गाठून जाब विचारत लग्नाचा तगादा लावला असता संशयिताने तिला शिवीगाळ व मारहाण करीत लग्नास नकार दिला. त्यामुळे युवतीने पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक हांडोरे करीत आहेत.