नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक हे धार्मिक पर्यटन स्थळ असून याठिकाणी दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरत असतो. या धार्मिक क्षेत्रात विविध समाजाची सेवा भवन आहे. मात्र अद्याप राजस्थान राजपूत समाज बांधवांना सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रम राबविण्यासाठी व राज्याबाहेरून नाशिकमध्ये येणाऱ्या भाविकांच्या निवासाची व्यवस्था होण्यासाठी नाशकात राजस्थान राजपूत भवन उभारण्याचा निर्णय क्षत्रिय समाज फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आला आहे.
नाशिकच्या बालाजी हॉटेल मध्ये नुकतीच क्षत्रिय समाज फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीस राज्यस्तरीय सल्लागार समितीची स्थापना करण्यात आली. या सल्लागार समितीत वरिष्ठ सल्लागार पदी रंजीत सिंह चुंडावत, तेजपाल सिंह शेखावत लक्ष्मण सिंह चौहान, मोहन सिंह शेखावत, दयाल सिंह चौहान, नरेंद्र सिंह जोधा, प्रेम सिंह राठौड़, मदन सिंह शेखावत, सुबे सिंह राघव यांची सल्लागार समितीत निवड करण्यात आली.
या बैठकीत क्षत्रिय समाज फाउंडेशनचे अध्यक्ष भगतसिंह राठौड़, उपाध्यक्ष विनोद सिंह शेखावत, सचिव सरवन सिंह शेखावत, प्रभारी नारायण सिंह राठौड़, कोषाध्यक्ष गिरवर सिंह राठौड़, समिती सदस्य बलवीर सिंह शेखावत, गजेंद्र सिंह शेखावत, प्रदीप सिंह राठौड़, संजीत सिंह राठौड़, राम सिंह भाटी, नेपाल सिंह, प्रदीप सिंह, अरविंद सिंह शेखावत, जगदीश सिंह राठौड़, कालू सिंह राठौड़, दलपत सिंह राठौड़, भगवान सिंह राठौड़, चंदन सिंह, छतर सिंह चौहान, अभय सिंह चुंडावत, पुष्पाल सिंह चुंडावत, मदन सिंह, अरविंद सिंह चुंडावत, बजरंग सिंह शेखावत, सोहन सिंह, छैल सिंह, किशोर सिंह, नरेंद्र सिंह जोधा, राम सिंह नरूका, राजेंद्र सिंह नरूका, महिपाल शेखावत, चैन सिंह, अजय सिंह राठौड़, प्रभु सिंह शेखावत, अर्जुन सिंह चौहान, तेजपाल सिंह संजीत सिंह यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.