मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. ठाणे शहरातील एका रुग्णालयात ही शस्त्रक्रिया पार पडली.
गेल्या काही दिवसांपासून त्यांना डोळ्याचा त्रास जाणवत होता. तपासणीनंतर डॉक्टरांनी लेझर ट्रिटमेंटद्वारे शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. आज सकाळी शिंदे यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.
शिंदे यांनी गुरुवारी त्यांचा नातू रुद्रांशचा वाढदिवस ठाण्यातील निवासस्थानी साजरा केला. त्यानंतर आज त्यांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया झाली. शस्त्रक्रियेनंतर शिंदे यांची प्रकृती स्थिर आहे. शिंदे यांच्या चष्म्याचा नंबर बदलल्यानंतर त्यांना जवळचे अस्पष्ट दिसत होते.