नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई आग्रा महामार्ग वर गोंदे फाट्यावर असलेल्या शालिमार कंपनी मध्ये स्लॅप खाली पडल्याची घटना घडली. या दुर्घटनेत तीन जण जखमी झाले. पाच ते सहा कामगार येथे काम करत होते. त्यातील दोघे गंभीर तर एक कामगार किरकोळ जखमी झाला आहे.
या अपघातात छोटु सिंग (२६), मोटु सिंग (२७), नारायन माळी (३८) हे जखमी झाले आहे. या अपघाताची माहिती मिळताच गोंदे फाटा स्पॅाटवर उभी असलेली जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानची मोफत रुग्णवाहिका लगेचच अपघात स्थळी पोहोचली व त्या जखमींना त्यांच्या सांगण्यावरून तात्काळ नाशिकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले.