वंदना वेदपाठक, इंडिया दर्पण वृत्तसेवा
रामानंद सागर प्रस्तुत’रामायण’ ही लोकप्रिय टेलिव्हिजन मालिका जी १९८७ मध्ये पहिल्यांदा प्रसारित झाली होती. त्यावेळी रामायण या मालिकेने सर्वांच्याच मनावर अधिराज्य राज्य केले होते. अशातच आता रामायण ही मालिका पुन्हा पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे.
‘रामायण’ ही मालिका डीडी नॅशनलवर प्रसारित होणार आहे. नुकतीच याबाबत दूरदर्शन नॅशनलच्या (डीडी नॅशनल) अधिकृत X हँडलवर माहिती देण्यात आली आहे. रामायण मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्यानं आता प्रेक्षकांना आनंद झाला आहे.
रामायण’ ही मालिका त्यावेळी छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय मालिका होती. ती पाहण्यासाठी लोक एकत्र जमायचे. १९८७ साली ही मालिका प्रसारित झाली होती. आजही या मालिकेची लोकप्रियता कायम असल्याचे पाहायला मिळते. आता ही मालिका पाहायला मिळणार म्हणजे ‘मंगल भवन अमंगल हारी..या सुमधुर ओळी पुन्हा कानावर पडणार आहे. या मालिकेला संगीत रवींद्र जैन यांनी दिले आहे. २२ जानेवारी रोजी अयोध्येतील मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठापनेनंतर प्रत्येक भक्त राममय झाला. त्यात आता पुन्हा एकदा रामायण पहायला मिळणार आहे .ही खूप मोठी पर्वणीच ठरणार आहे.