गुरूवार, सप्टेंबर 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

मराठी नाट‌्य परिषदेचा विभागीय नाट्य संमेलनाचा सोहळा असा रंगला

by Gautam Sancheti
फेब्रुवारी 3, 2024 | 12:30 am
in राष्ट्रीय
0
unnamed 2024 02 03T002848.049 e1706900424279

बीड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रंगभूमी तसेच रंगकर्मींसाठी शासन निधी कमी पडू देणार नसल्याचे प्रतिपादन उद्योग मंत्री तथा नाट‌्य परिषदेचे विश्वस्त उदय सामंत यांनी आज १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट‌्य परिषदेच्या विभागीय नाट्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी केले.

स्व. सुहासिनी इर्लेकर रंगमंच येथे उद्घाटन समारंभाच्या प्रसंगी सामंत बोलत होते. याप्रसंगी पालकमंत्री आणि कार्यक्रमाचे उद्घाटक धनंजय मुंडे, नाट्य परिषद, मुंबईचे अध्यक्ष प्रशांत दामले, विश्वस्त मोहन जोशी, आमदार प्रकाश सोळंके, जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे, पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, मुख्य कार्यकारी अधिकारी निता अंधारे, स्वागताध्यक्ष डॉ.योगेश क्षीरसागर, सारिका क्षीरसागर, दिपाताई क्षीरसागर विजय गोखले, चंद्रकांत कुलकर्णी , अभिनेते संदीप पाठक, अजित भुरे, सतीश लोटके, भाऊसाहेब भोईर, सचिन पाटील मंचावर तर मंचासमोर अनेक नाट‌्य तसेच सिनेसृष्टीचे दिग्गज उपस्थित होते.

श्री. सामंत पुढे म्हणाले, महाराष्ट्राच्या मातीत नाटक संस्कृतीचे रोपटे हे वटवृक्ष झाले आहे. हे वटवृक्ष सदा सर्वदा हिरवेगार असावे त्यासाठी आमच्या कडून आम्ही प्रयत्न करीत आहोत. मुंबई लगत वृद्ध कलाकारांसाठी निशुल्क असे वृद्धा आश्रम बांधले जाईल, जेणे करून कलाकारांचे वृद्धपकाळात गैरसोय होऊ नये याची काळजी शासनातर्फे घेतली जाईल, असेही श्री. सामंत यावेळी म्हणाले.

जागर उपक्रमातंर्गत राज्यभर नाट‌्य स्पर्धा आयोजित करण्यात आली त्यातून उद्याचे उत्कृष्ट कलाकार, निर्माते, दिग्दर्शक घडतील, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. 101 वे अखिल भारतीय नाट‌्य संमेलन परीळ वैद्यजनाथ येथे व्हावे, असा मनोदय पालकमंत्री यांनी व्यक्त केल्यावर विश्वस्त बैठकीत याबाबत सकारात्म्क निर्णय घेण्याचे आश्वासक आश्वासन यावेळी श्री सामंत यांनी दिले.

बीड जिल्ह्याने राज्याच्या नाट्य चळवळीत उल्लेखनीय कामगिरी केली : धनंजय मुंडे

बीड जिल्ह्याने राज्याच्या नाट्य चळवळीत उल्लेखनीय कामगिरी केले असून अनेक दिग्गज कलाकार या मातीतून आलेले आहेत, असे प्रतिपादन पालकमंत्री आणि नाट‌्य परिषदेचे उद्घाटक धनंजय मुंडे यांनी केली.

ते पुढे म्हणाले, कलाक्षेत्राच्या विकासासाठी राजश्रय लागतो तो देण्याचा प्रामाणिक प्रयत्न असून तो यापुढे ही राहील. बीड जिल्ह्यातील उपलब्ध नाट्य गृहांमध्ये सोयी-सुविधा व नाट्यगृह नसलेल्या ठिकाणी नाट्यगृह उभारण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले जातील, याप्रसंगी नमूद केले. यावेळी राज्यभरातून या संमेलनासाठी आलेले सर्व रंगकर्मी व रसिकांचे स्वागत करून नाट्य संमेलनास श्री मुंडे यांनी शुभेच्छा दिल्या.

कलाकार आणि प्रेक्ष्‍क यांच्यात अस्पष्ट रेष असते : प्रशांत दामले
कलाकार आणि प्रेक्षक यांच्यात अस्पष्ट रेष असते कधी ती पुसली जाते हे कळतच नाही असे भावनिक उदगार ज्येष्ठ नाटक अभिनेते तथा नाट‌्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी काढले. उत्तम प्रेक्षक तयार करने ही पालकांची जबाबदारी आहे. नाट्य क्षेत्रात काम करताना पूर्ण वेळ काम करावे, अर्ध वेळ करू नये असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. मराठवाडाचे प्रेक्षक हे नाटकाचे चाहते आहेत. त्यांनी भरभरून प्रेम दिले असल्याच्या भावना यावेळी त्यांनी व्यक्त केल्या.

यावेळी मोहन जोशी यांनी ही मनोगत मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वागताध्यक्ष डॉ. योगेश क्षीरसागर यांनी केले तर कार्याध्यक्ष तथा अध्यक्ष डॉ. दीपा क्षीरसागर यांनीही मनोगत मांडले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राष्ट्रपतींच्या हस्ते सुरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळ्याचे उद्घाटन

Next Post

पुन्हा एकदा ‘मंगल भवन अमंगल हारी’ चे मधुर स्वर कानावर पडणार!!

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

crime1
क्राईम डायरी

घरातील साफ सफाई करणा-या दांम्पत्याने बंगला मालकाच्या साडेसहा लाखाच्या दागिण्यांवर मारला डल्ला

सप्टेंबर 18, 2025
court 1
महत्त्वाच्या बातम्या

हैदराबाद गॅझेटविरोधी याचिका हायकोर्टाने फेटाळली…मराठा समाजाला दिलासा

सप्टेंबर 18, 2025
accident 11
क्राईम डायरी

अज्ञात चारचाकीने दिलेल्या धडकेत ४८ वर्षीय महिला ठार…नाशिक येथील घटना

सप्टेंबर 18, 2025
crime114
क्राईम डायरी

मैत्रिणीशी लग्न केले म्हणून टोळक्याने तरूणाचे अपहरण करुन लुटले…त्र्यंबरोड भागातील घटना

सप्टेंबर 18, 2025
rohit pawar
संमिश्र वार्ता

रोम जळत आहे आणि निरो बासरी वाजवत आहे…रोहित पवार यांची मुख्यमंत्र्यावर टीका

सप्टेंबर 18, 2025
cbi
संमिश्र वार्ता

सीबीआय न्यायालयाने वरिष्ठ पासपोर्ट अधीक्षकांच्या मालमत्ता जप्त करण्याचे दिले आदेश

सप्टेंबर 18, 2025
Untitled 25
महत्त्वाच्या बातम्या

हायड्रोजन बॅाम्ब…राहुल गांधी यांची पत्रकार परिषद…बघा लाईव्ह

सप्टेंबर 18, 2025
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सेवा पंधरवड्याचे उद्घाटन2 2
मुख्य बातमी

येत्या १ मे पर्यंत सेवा हमी कायद्यांतर्गत ११०० सेवा डिजीटल होणार…

सप्टेंबर 18, 2025
Next Post
Untitled 8

पुन्हा एकदा 'मंगल भवन अमंगल हारी' चे मधुर स्वर कानावर पडणार!!

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011