इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
प्रवाशांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि अधिक प्रवाशांची सोय करण्यासाठी भारतीय रेल्वे परिचालन व्यवहार्यता, संसाधनांची उपलब्धता, स्पर्धात्मक मागणी इत्यादींच्या अधीन राहून नवीन सेवा सुरू करत आहे, सध्याच्या सेवा आणि त्यांची वारंवारता, मालवाहतूक वाढवत आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात मूलभूत आधारावर प्रवाशांची संख्या 639 कोटी आहे.
याशिवाय, सणासुदीच्या काळात, सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन विशेष गाड्या चालवणे आणि गाड्यांची तात्पुरती वाढ करणे ही कामेही हाती घेतली जातात.
रेल्वे स्थानकांवर गर्दीमुळे होणारी चेंगराचेंगरी आणि अपघात टाळण्यासाठी रेल्वेने पुढील पावले उचलली आहेत:-
- रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ), कर्मचारी व्यावसायिक विभाग आणि सरकारी रेल्वे पोलिस (जीआरपी) यांच्या समन्वयाने गर्दीच्या व्यवस्थापनासाठी स्थानकांवर आणि रेल्वेच्या आवारात तैनात आहेत.
- सणासुदीच्या काळात अनारक्षित डब्यांमध्ये प्रवाशांच्या सुव्यवस्थित प्रवेशासाठी आरपीएफकडून सर्व प्रयत्न केले जातात आणि गाड्या येण्यापूर्वी प्लॅटफॉर्मवर प्रवाशांच्या रांगा लावल्या जातात.
- गर्दी नियंत्रणासाठी पब्लिक ऍड्रेस प्रणालीद्वारे वारंवार घोषणा केल्या जातात.
- जीआरपीच्या समन्वयाने प्रवाशांच्या हालचालींचे नियमन करण्यासाठी फूट ओव्हर ब्रिज, आगमन आणि निर्गमन ठिकाणे, फलाट इत्यादींवर आरपीएफचे कर्मचारी कार्यरत आहेत.
- प्रशिक्षित आरपीएफ कर्मचारी क्लोज्ड सर्किट टेलिव्हिजन (सीसीटीव्ही) देखरेख कक्षांमध्ये गर्दीच्या भागावर लक्ष ठेवण्यासाठी आणि स्थानकाच्या – आवारात नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना पुढील माहितीसाठी संभाव्य गर्दीच्या हालचालींचा अंदाज लावण्यासाठी तैनात केले आहेत.
- रेल्वे सुरक्षा विशेष दल (आरपीएसएफ) बटालियनकडून सुरक्षा कर्मचाऱ्यांचे अतिरिक्त मनुष्यबळ पुरवले जाते.
- साध्या वेशातील कर्मचारी तैनात करून गुन्हेगारी कारवायांवर देखरेख आणि दक्षता सुनिश्चित केली जाते.
- 31.03.2023 पर्यंत, 65301 प्रवासी डबे परिचालनासाठी उपलब्ध आहेत.
- कोविड-19 महामारीचा प्रसार रोखण्यासाठी, भारतीय रेल्वेने 23 मार्च 2020 पासून सर्व नियमित प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्यांचे परिचालन बंद केले होते आणि फक्त विशेष रेल्वे सेवा चालवल्या जात होत्या. दरम्यान, भारतीय रेल्वेने आयआयटी मुंबई च्या सहाय्याने वैज्ञानिक पद्धतीने वेळापत्रकाचे सुसूत्रीकरण हाती घेतले आहे. इतर गोष्टींबरोबरच, देखभाल कॉरिडॉर ब्लॉक्स तयार करून, विद्यमान वेळापत्रकातील विसंगती कमी करून प्रवाशांची चांगली सुरक्षा प्रदान करण्यासाठी हा सराव हाती घेण्यात आला आहे, ज्यामध्ये प्रवासी सेवांचे मेल/एक्स्प्रेस सेवांमध्ये रूपांतर करणे समाविष्ट आहे. नोव्हेंबर-2021 पासून, मेल/एक्स्प्रेस रेल्वे सेवा सुसंगत वेळापत्रकानुसार आणि नियमित क्रमांकांनुसार चालवल्या जात आहेत.
ही माहिती रेल्वे, दळणवळण आणि इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.