नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सातपूरमध्ये निगरमळा साळुंखे नगर परिसरात मंगळवारी दुपारच्या सुमारास बिबट्याचा वावर वाढल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या ठिकाणी बिबट्याने एका शेळीची शिकार केल्याची घटना घडल्यामुळे या भीतीत भर पडली. त्यामुळे बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी येथील स्थानिकांनी केली आहे.
या संदर्भात परिसरातील नागरिकांनी सावध राहण्यासाठी फॉरेस्ट विभागाच्या वतीने तेथील काही स्वयंसेवक नागरिकांनी घराबाहेर पडू नये याकरिता जनजागृती करत असल्याचे समजते. यासंदर्भात फॉरेस्ट विभागाशी संपर्क साधला असता त्यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.
तसेच तेथील सामाजिक कार्यकर्ते देखील नागरिकांची जनजागृती करीत आहेत. गेल्या काही दिवसापासून बिबट्याचा वावर शहरी भागात वाढला आहे. काही ठिकाणी हल्याच्या घटना घडल्या आहे.