भुसावळ (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भुसावळ, जळगाव, मनमाड येथून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या मार्गावर फारशा रेल्वे धावत नाही. त्यामुळे आता नव्याने अमरावती सातारा दरम्यान 01155/56 ही विशेष गाडी सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजेच रिझर्व्हेशन करण्याची गरज नाही नाहीय. ही गाडी अनारक्षित आहे.
या गाडीमुळे एकमेव महाराष्ट्र एक्सप्रेस नंतर पुणे जाणाऱ्या प्रवाशांना दुसरी गाडीमुळे दिलासा मिळाला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी अमरावती- सातारा अनारक्षित ही विशेष गाडी क्रमांक 01155 सुरू झाली आहे. अमरावतीहुन ही गाडी दुपारी १.३० वाजेल सुटेल. त्यानंतर भुसावळ ही गाडी सायंकाळी ५ वाजून १० मिनिटाने पोहोचेल. जळगावला ५ वाजून ३७ मिनिटाने पोहोचेल.तर पहाटे पुण्याला ती ३ वाजून ४० मिनिटाने पोहोचेल. सातारा येथून ही विशेष गाडी क्रमांक 01156 ही 28 जानेवारीस सातारा येथून साडेचारला सुटेल. तर अमरावती येथे दुसऱ्या दिवशी ११.०० वाजता पोहोचेल.
या स्थानकांवर थांबेल
अमरावतीहुन सुटल्यानंतर बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड,कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौड कॉर्ड लाइन, पुणे, जेजुरी, लोणंद आणि सातारा या स्थानकावर थांबेल. या गाडीत सर्व १४ डबे सामान्य द्वितीय श्रेणीचे असतील. यामुळे प्रवाश्यांनी या गाडीचा अधिकाधिक लाभ घ्यावा असे रेल्वे प्रशासनाने केले आहे.