सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिन्नर तालुका सहकारी औद्योगिक वसाहत मुसळगाव येथील केमिकल असलेल्या आदिमा ऑरगॅनिक या केमिकल कंपनीला शुक्रवारी दुपारच्या सुमारास अचानक आग लागल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. ही आग लागल्यानंतर अग्निशामक बंब दाखल झाले असून आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करण्यात येत आहे.
ही आग दुपारी सव्वाचार वाजेच्या सुमारास लागली. या आगीमुळे आकाशात आगीचे लोळ सर्व दूर दिसत असल्याने नागरिकांमध्ये एकच घबराट पसरली. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. स्फोटाचे आवाजही येत असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. या कंपनीच्या बाहेर सिन्नर तालुका सहकारी औद्योगिक वसाहतीचे चेअरमन नामकरण आवारे, व्यवस्थापक कमलाकर पोटे तसेच मुसळगाव एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक यशवंत बाविस्कर हे घटनास्थळी दाखल झाले.
या कंपनीनत ५० ते ६० कामगार असून ते बाहरे असल्याचे स्थानिकांनी सांगितले. ही आग लागल्यानंतर सिन्नर तालुका औद्योगिक वसाहतीचे सर्व कर्मचारी तसेच सिन्नर नगर परिषदेचे अग्निशामक नाशिक येथील अग्निशामक बंब व माळेगाव येथील अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले.