नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – धावत्या धुळे-दादर एक्सप्रेसमधून धूर निघाल्यामुळे प्रवाशांचा चांगलाच गोंधळ उडाला. निफाड रेल्वे स्थानका दरम्यान ही आज सकाळी साडेनऊ वाजता घडली.
या घटनेबाबात अधिक माहिती अशी की, निफाड रेल्वे स्थानकाजवळ नाशिकच्या दिशेने लासलगाव येथून सकाळी साडेनऊ वाजेच्या दरम्यान निघालेली धावत्या धुळे-दादर एक्सप्रेसच्या डी २ बोगीतून हा धूर निघाला. हा धूर निघू लागल्याने प्रवाशांचा एकच गोंधळ उडाल्याने ही रेल्वे गाडी निफाड स्थानकावर थांबवण्यात आली. त्यानंतर त्याची तपासणी केल्यानंतर चाकाला प्लास्टिकचा ब्रेक चिटकल्याने दूर निघत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर रेल्वे कर्मचा-यांनी ब्रेक दुरुस्त केले. त्यानंतर गाडी नाशिकच्या दिशेने रवाना झाली.
निफाड येथे धुळे दादर एक्सप्रेस थांबवण्यात आल्याने या गाडीतील चाकरमान्यांचे वेळेत कामावर पोचण्यासाठी हाल झाल्याची चित्र पाहवयास मिळाले.