रविवार, ऑगस्ट 31, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

अमनेरमध्ये साहित्य संमेलनात चार हजार मराठी सारस्वतांचा सहभाग, तीन किलो मिटरची दिंडी

by Gautam Sancheti
फेब्रुवारी 2, 2024 | 1:02 pm
in संमिश्र वार्ता
0
IMG 20240202 WA0175 e1706859147563


अमळनेर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) : शंखनाद, टाळमृदंग अन्‌‍ ढोलताश्यांच्या गजरात ग्रंथांचे पूजन करून ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीस महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे व जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. रविंद्र शोभणे, संमेलनाध्यक्ष तथा राज्याचे ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन, निमंत्रक तथा मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, अमळनेरच्या मराठी वाड्:मय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी, माजी आमदार स्मिता वाघ यांच्या सह मराठी साहित्य महामंडळ व मराठी वाड्:मय मंडळाचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत श्रीसंत सद्गुरू सखाराम महाराज विठ्ठल संस्थान (वाडी संस्थान) येथून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. ग्रंथदिंडीच्या पालखीत दासबोध, श्री ज्ञानेश्वरी, भारताचे संविधान, श्रीमद्‌‍ भगवतगीता, भारतीय संस्कृती या ग्रंथ गुरूंचा समावेश होता.

सकाळी ८ वाजता ग्रंथदिंडीस सुरवात होणार असल्याने अमळनेर शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी. प्राध्यापक, शिक्ष्ाक, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी याच्यासह सुमारे ४ हजार सारस्वतां च्या गर्दीने अमळनेर शहर फुलले होते. दिंडी जशजशी पुढे पुढे जात होती तस तशी दिडीवर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला जात होता. यामुळे मराठी सारस्वतांचा उत्साह अधिकच व्दिगुनीत होत होता.

ग्रंथदिंडीच्या मार्गापासून तर दिंडी पान खिडकी, सराफ बाजार, दगडी दरवाजा, राणी लक्ष्मीबाई, सुभाष चौक ,स्टेट बॅंक, पोस्ट ऑफिस, नाट्यगृह, उड्डाणपूल या चौकात विविध रांगोळी काढून ग्रंथांसह सारस्वतांचे स्वागत केले. सकाळी 8 वाजता सुरू झालेली दिंडी संमेलन स्थळी दहा वाजता पोहचली. मंत्री गिरीश महाजन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष्ा अशोक जैन, केशव स्मृती सेवा संस्था समूहाचे अध्यक्ष्ा डॉ, भरतदादा अमळकर यांनीही या दिंडीत सहभाग घेत एक किलो मिटर अंतर पायी चालले, तर मंत्री महाजन यांनी दंडी मार्गावरील विविध थोर महापुरूषांच्या पुतळ्यांना मार्ल्यापर्ण करून अभिवादन केले.

या संस्थानांचा होता सहभाग
केशव शंखनाद पथक, पुणे, खान्देश शिक्षण मंडळ संचालित प्रताप महाविद्यालय,महाविद्यालयाचे प्राचार्य उपप्रचार्य, सर्व विभाग प्रमुख, कर्मचारी, एनएसएस, एनसीसी, वसतीगृह विद्यार्थ्यांसह सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, ढोल ताशा पथक, गंगराम सखाराम शाळा अमळनेर, द्रो. रा. कन्या शाळा, अमळनेर, प्रताप हायस्कूल, अमळनेर, मंगळग्रह संस्थान ग्रंथ पालखी, स्वामी विवेकानंद शाळा, बंजारा समाज पारंपरिक नृत्य चाळीसगाव, धनगर समाज पारंपारिक नृत्य, वासुदेव पथक जामनेर, नवलभाऊ प्रतिष्ठान आर्मी स्कूल, सावित्रीबाई फुले शाळा अमळनेर, साने गुरूजी शाळा, नगर परिषद सर्व कर्मचारी अमळनेर, मराठी वाड:मंय मंडळाचे सर्व समिती सदस्य, वारकरी पाठशाळा अमळनेर, नंदगाव माध्यमिक विद्यालय, भरवस माध्यमिक विद्यालय, पोलीस प्रशासन, प्रांताअधिकारी, महराष्ट्र मतदान विभाग, फार्मसी महाविद्यालय, एसएनडीटी कॉलेज, एमएसडब्लू कॉलेज, टाकरखेडा माध्यमिक हायस्कूल, उदय माध्यमिक विद्यालय, चौबारी माध्यमिक विद्यालय, रणाईचा माध्यमिक आश्रमशाळा, हातेड माध्यमिक शाळा, कोळपिंप्री माध्यमिक विद्यालय, शारदा माध्यमिक शाळा कळमसरे, पी. एन. मुंदडा माध्यमिक शाळा, इंदिरा गांधी माध्यमिक शाळा, गडखांब माध्यमिक व उच्च माधमिक कॉलेज.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

उपमुख्यमंत्री अजित पवार अमळनेरमध्ये..या कामाचे केले भूमिपूजन

Next Post

राज्यसभेची निवडणूक होणार बिनविरोध…या उमेदवारांना मिळणार संधी

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

Sharad Pawar
महत्त्वाच्या बातम्या

आज शरद पवार घेणार आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांची भेट…

ऑगस्ट 31, 2025
cbi
संमिश्र वार्ता

सीबीआयची मोठी कारवाई….२३२ कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी विमानतळाचा हा अधिकारी गजाआड

ऑगस्ट 31, 2025
fir111
आत्महत्या

विवाहीतेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल

ऑगस्ट 31, 2025
manoj jarange
संमिश्र वार्ता

कधीपर्यंत भाजपची री ओढणार…राज ठाकरे यांच्यावर मनोज जरांगे पाटील यांची टीका

ऑगस्ट 31, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी खर्चावर नियंत्रण ठेवावे, जाणून घ्या, रविवार, ३१ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 30, 2025
manoj jarange
महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पोलिसांनी दिली आणखी एक दिवसाची मुदतवाढ…

ऑगस्ट 30, 2025
udhav 11
महत्त्वाच्या बातम्या

उध्दव ठाकरेंचा मनोज जरांगे पाटील यांना फोन…दीड ते दोन मिनिट चर्चा

ऑगस्ट 30, 2025
Gzl81fKWwAE3m6S 1920x1091 1
महत्त्वाच्या बातम्या

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन….

ऑगस्ट 30, 2025
Next Post
Untitled 5

राज्यसभेची निवडणूक होणार बिनविरोध…या उमेदवारांना मिळणार संधी

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011