इंडिया दर्पण वृत्तसेवा
तामिळनाडूमध्ये २७ ते ३१ जानेवारी दरम्यान चेन्नई येथे ६ व्या राष्ट्रीय खेलो इंडिया जलतरण स्पर्धेत नाशिकच्या अदिती हेगडे हिने राज्याचे प्रतिनिधित्व करताना दोन सुवर्ण आणि दोन रौप्य आणि एक कास्य पदकाची कमाई केली आहे, आदितीने १०० मीटर बटरफ्लाय सुवर्ण, २०० मीटर फ्री स्टाईल रौप्य, ४०० मीटर फ्री स्टाईल कास्य ,आणि आणि ४१०० फ्री स्टाईल रीलेमध्ये सुवर्ण पदक तर ४१०० मीटर मिडले रिले प्रकारात रौप्य अशी ५ पदक प्राप्त केले आहे. आदितीने नुकत्याच झालेल्या राष्ट्रिय शालेय स्पर्धेत देखील चार पदके मिळवली होती.
या स्पर्धेत महाराष्ट्राच्या जलतरण पटूनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरी मुळे राज्याने चौथ्यांदा पदक तालिकेत प्रथम स्थान मिळविले आहे. त्यात नाशिकच्या आदितीचा पाच पदकांचा वाटा आहे. ही बाब नाशिकसाठी अभिमानास्पद आहे.
आदिती ही नाशिक मनपाच्या राजमाता जिजाऊ जलतरण तलाव नाशिक रोड येथे सेवानिवृत्त साई प्रशिक्षक शंकर मादगुंडी, विकास भडांगे यांच्या मार्गदर्शनाखाली रोज सकाळ सायंकाळ सराव करते .अदितीच्या यशामागे तरुण तलाव व्यवस्थापक माया जगताप स्वीमर फाउंडेशनचे पदाधिकारी आणि मनपाचे अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.