इंडिया दर्पण वृत्तसेवा
नागपूर जिल्ह्यासाठी पुढील ५ दिवसासाठी हवामान आधारित कृषी सल्ला खालील प्रमाणे देण्यात आला आहे.
- भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर कडून दिनांक २४ सप्टेंबर, २०२३ रोजी च्या प्राप्त जिल्हानिहाय पर्जन्यमान अंदाजानुसार,
- दिनांक २५ सप्टेंबर २०२३ रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची अधिक शक्यता,
- दिनांक २६, २७ व २८ सप्टेंबर २०२३ रोजी *काही/विरळ ठिकाणी खूप हलक्या ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची अधिक शक्यता वर्तविण्यात आली आहे.
इशारा:
- दिनांक २४, २५ व २६ सप्टेंबर २०२३ रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
सामान्य सल्ला:
- जिल्ह्यामध्ये पुढील २ दिवसांसाठी काही ते बऱ्याच ठिकाणी हलक्या त मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज लक्षात घेता कृषी रसायनांच्या फवारणीची कामे, उभ्या पिकामध्ये खते देण्याची कामे तसेच आंतरमशागतीची कामे पुढील २ ते ३ दिवस पुढे ढकलावी तसेच सध्याच्या पावसाच्या उघाडी नंतर स्थानिक स्वच्छ व शांत हवामान परिस्थिती असताना करावी.
- मागील आठवड्यात झालेला पाऊस व अपेक्षित पावसाचा अंदाज लक्षात घेता पिक क्षेत्रामध्ये दीर्घ काळ पावसाचे पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा पीक क्षेत्रा मधून निचरा करावा.
- पुढील ३ दिवस तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता लक्षात घेता शेतकरी व शेतमजूर बांधवांनी शेतात काम करत असताना मेघगर्जनेची चाहूल लागताच तात्काळ सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. आवश्यकता नसल्यास शेतात जाणे टाळावे.
- गाय, म्हैस, शेळ्या व इतर पाळीव जनावरे मोकळ्या जागेत चरावयास सोडण्याचे टाळावे. जनावरे हे खुल्या पाण्याचे स्त्रोत, नदी किंवा तलाव व ट्रॅक्टर व इतर धातूच्या अवजारांपासून दूर ठेवावे. तसेच जनावरांचा झाडाखाली आश्रय टाळावा. जनावरे हि वाहत्या पाण्याच्या प्रवाहातून जाणार नाही दक्षता घ्यावी.
-शेतीतील अत्यावश्यक महत्वाची कामे करताना शेतमजुरांना शेतामध्ये एकत्रित समूहाने काम करू न देता दोन व्यक्तीमध्ये जास्तीत जास्त अंतर ठेवावे. शेतात आसरा घेताना पाण्याचे स्त्रोत (विहीर, तलाव, नदी इत्यादी), उंच ठिकाणे (झाडे, उंचवटे), धातूचे अवजारे या पासून जास्तीत जास्त अंतरावर आसरा घ्यावा. उंच ठिकाणांवर वीज आकर्षित होत असल्याने कोणत्याही परिस्थितीमध्ये झाडाखाली आसरा घेणे टाळावे. - विजांच्या ठीकांणाची निरीक्षणे तसेच पूर्वसूचना प्राप्त करण्याची “दामिनी” (Damini- Lightning alert) या मोबाईल अॅप चा वापर करावा.
- अॅप डाऊनलोड करण्यासाठी लिंक: https://play.google.com/store/apps/details?id=com.lightening.live.damini&hl=en&gl=US&pli=1
- नागपूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी हवामान आधारित कृषी सल्ला प्राप्त करण्यासाठी डॉ. सचिन वानखेडे, विषय विशेषज्ञ, कृषी हवामान शास्त्र, कृषी विज्ञान केंद्र, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर यांचा हा 9552703020 मोबाईल क्रमांक व्हाटस अॅप ग्रुप मध्ये समाविष्ठ करावा.
- आपत्कालीन परिस्थिती मध्ये मदतीसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नागपूर, जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर यांच्या 0712 2562668 या क्रमांकावर संपर्क करावा.*
सौजन्य: जिल्हा कृषी हवामान केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर व प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर