नांदगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस जटील बनला असून तालूक्यातील धरणातील पाणी साठा हळू हळू आताच संपुष्टात येत असल्याने नगरपालिकेला पाणी पुरवठा करण्यात अडचण येत आहे. शहरातील सावता नगर भागात गेल्या महिन्यांभरापासून पाणी पुरवठा झालेला नसल्याने या परिसरातील महिलांनी रिकामे हंडे घेत मालेगाव महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.ॉ
अखेर पोलिसांनी नगरपालिका अधिकारी व आंदोलकांशी यशस्वी चर्चा घडवत पाणी पुरवठा सुरळीत होईल असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलक महिलांनी आंदोलन मागे घेतले.