सटाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथे कांदा प्रश्नावर शेतकरी संघटनेने रास्ता रोको आंदोलन केले. बाजार समितीच्या गेट समोर मालेगाव-सटाणा रस्त्यावर शेतकऱ्यांनी कांदा ठेवत आपला संताप व्यक्त केला.
या आंदोलनात कांद्याची निर्यातबंदी मागे घ्यावी, कांद्याला हमीभाव मिळावा या मागण्या करण्यात आल्या. सुमारे अर्धातास झालेल्या या रास्ता रोको आंदोलना मुळे या मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती.
काल लासलगाव येथे शेतक-यांनी लिलाव बंद पाडले तर आज शेतकरी संघटनेने रास्ता रोको केला. गेल्या काही दिवसांमध्ये कांद्याचे घसरते दर पाहता यापुढे शेतकरी आणखी आक्रमक होण्याची चिन्हे दिसू लागली आहे.