नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आमदार देवयानी फरांदे यांच्या प्रयत्नातून नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात विकासाची गंगा आणली जात आहे. गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असणारे कामे शासन स्तरावर पाठपुरावा करून पूर्णत्वास नेण्याचे काम आमदार देवयानी फरांदे यांच्याकडून अविरत सुरू आहे. नाशिक येथील सीबीएस हे देखील नाशिक शहरातील बहुप्रतीक्षित काम होते.
गेले अनेक वर्षांपासून नाशिक सीबीएस निधीच्या प्रतीक्षेत होते. आमदार देवयानी फरांदे यांनी सदर बाबीकडे लक्ष देऊन सीबीएस बस स्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी दहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून घेतला आहे. सीबीएस येथील जुनी इमारत पाडून नवीन इमारत व आगार उभे राहणार आहे. यासाठी दोन मजली इमारत उभी राहणार असून तळमजल्यावर ९५० चौरस मीटर चे काम होणार आहे. तर पहिल्या मजल्यावर ५९० चौरस मीटरचे काम होणार आहे. नवीन इमारत व आगारासाठी सांडपाण्याची व्यवस्था देखील नव्याने करण्यात येणार आहे.
सीबीएस परिसरातील ४४०० चौरस मीटर क्षेत्राचे काँक्रिटीकरण करण्यात येणार असून पेवर ब्लॉक देखील लावण्यात येणार आहे. फायर फायटिंग मध्ये व रेन हार्वेस्टिंग यासारख्या अत्याधुनिक सुविधा देखील उपलब्ध होणार आहे. मेळा बस स्थानकाची सुंदर इमारत उभी राहिल्यानंतर आमदार देवयानी फरांदे यांनी सीबीएससीचे काम हाती घेतल्यामुळे आता येथे देखील सुंदर इमारत उभी राहील अशा अपेक्षा व्यक्त केल्या जात आहे.