इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः जिल्हा न्यायालयाने ज्ञानवापीच्या तळघरात पूजा करण्याचे अधिकार दिल्यानंतर वाराणसीच्या ज्ञानवापी तळघरात पूजा आणि आरती झाली. ३१ वर्षांनंतर तळघर उघडण्यात येऊन पूजा झाली. आजपासून पाच आरत्या करण्यात येणार आहे. या आरतीचा व्हिडिओ अॅड. विष्णू शंकर जैन यांनी सोशल मीडियावर शेअर केला असून तो आपण प्रत्यक्ष बघू शकतात…
काल न्यायालयाच्या निर्णयानंतर काही तासांतच विश्वनाथ मंदिराचे मुख्य पुजारी ओम प्रकाश मिश्रा आणि गणेशवर द्रविड यांनी पूजा केली. त्यानंतर आज दिवसभर येथे कार्यक्रम सुरु होते. नोव्हेंबर १९९३ पर्यंत या ठिकाणी पूजा होत होती; परंतु तत्कालीन राज्य सरकारने ही पूजा थांबवल्याचा आरोप हिंदू पक्षकारांनी केला होता. न्यायालयाच्या आदेशानंतर काशी विश्वनाथ मंदिरातील नंदीसमोरील बॅरिकेडस्चा काही भाग हटवून नंतर तळघर उघडण्यात आले. रात्रीपासूनच संपूर्ण संकुलाला छावणीचे रूप आले होते.
जिल्हा न्यायालयाने ज्ञानवापीच्या तळघरात पूजा करण्याचे अधिकार दिले. तळघर मशिदीच्या आत आहे. भारतीय पुरातत्व विभागाने केलेल्या सर्वेक्षणात तिथे हिंदू देवी-देवतांची मूर्त्या मिळाल्या. हिंदू मंदिर असल्याचे पुरावे मिळाल्यानंतर मध्यरात्री पूजा झाली. गणेश-लक्ष्मीची आरती झाली.