नाशिक (इंडिया दर्पण वृत्तससेवा) ) – ठक्कर बाजार बसस्थानक परिसरात प्रवासी भरण्याच्या वादातून रिक्षाचालकास मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेत एका चालकास लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आल्याने तो जखमी झाला आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोकुळ सोमसे व अर्जुन जाधव असे रिक्षाचालकास मारहाण करणा-या संशयितांची नावे आहेत. याबाबत हर्षद राम लोखंडे (२५ रा.काळेनगर,महात्मानगर) यांनी फिर्याद दिली आहे. संशयित व जखमी रिक्षाचालक असून सोमवारी (दि.२९) दुपारच्या सुमारास लोखंडे ठक्कर बाजार बसस्थानक परिसरातील राजदूत हॉटेल समोरील निंबाच्या झाडाखाली आपल्या अॅटोरिक्षात प्रवासी बसवित असतांना ही घटना घडली.
लोखंडे यांचे परिचीत असलेल्या गोकुळ सोमसे व अर्जुन जाधव या दोघा रिक्षाचालकांनी तेथे येवून प्रवासी भरण्याच्या कारणातून वाद घालत त्यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. या घटनेत लाकडी दांडक्याचा वापर करण्यात आल्याने लोखंडे जखमी झाले असून अधिक तपास हवालदार जाधव करीत आहेत.