नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर एकाने वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अश्लिल व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत संशयिताने युवतीच्या नातेवाईकांना शिवीगाळ केल्यामुळे हा प्रकार पोलीसात पोहचला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार निलेश अर्जुन दळवी (३५ रा.ध्रुवनगर) असे संशयिताचे नाव आहे. याबाबत २४ वर्षीय पीडितेने फिर्याद दिली आहे. पीडिता व संशयित एकमेकांचे नातेवाईक असून, २०२२ मध्ये संशयिताने मुलीस फिरण्याचा बहाणा करून घोटी ता.इगतपुरी येथील हॉटेल विवांत रिसोर्ट येथे नेले होते. या ठिकाणी संशयिताने मुलीस लग्नाचे आमिष दाखवित बलात्कार केला.
यानंतर युवतीस अश्लिल फोटो व व्हिडीओ असल्याची बतावणी करीत ते व्हायरल करण्याची धमकी देत वेळोवेळी मुंबईनाका भागातील हॉटेल कोर्टयार्ड येथे घेवून जात बलात्कार केला. संशयिताचा अतिरेक वाढल्याने पीडितेने आपबिती आपल्या कुटुंबियाकडे कथन केल्याने हा वाद पोलीसात पोहचला असून, जाब विचारण्यासाठी गेलेल्या नातेवाईकांना संशयिताने धमकी देत शिवीगाळ केल्याने पीडितेने पोलीसात धाव घेतली आहे. अधिक तपा, उपनिरीक्षक ज्ञानेश्वर शेळके करीत आहेत.