इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई : वित्त विभागाने मंजुरी दिल्यामुळे राज्यात तब्बल १७ हजार ४७१ पोलिसांची भरती करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. अन्य विभागांना रिक्त पदांपैकी पन्नास टक्के पदांची भरती करण्यास मान्यता दिली आहे.
पोलिस विभागाला रिक्त शंभर टक्के पोलिसांची भरती करण्यास मान्यता दिल्यामुळे पोलिस शिपाई, बँण्डस्मँन, पोलिस शिपाई चालक, सशस्त्र पोलिस शिपाई व कारागृह शिपाई अशी १७ हजार ४७१ पदांची भरती करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यापूर्वीच्या सरकारच्या वेगवेगळ्या भरती परीक्षेतील गैरव्यवहार लक्षात घेता पोलिस भरती परीक्षेच्या वेळी जॅमर बसवण्याचा प्रायोगिक तत्त्वावर वापर करण्यात येणार आहे. यासाठी सायबर प्लॅटफॉर्म तयार करण्याचे काम सुरू आहे. सोशल मीडिया साईट, गेम सॉफ्टवेअरचा त्यात अंतर्भाव केला जाणार आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीसीटीव्हीसंदर्भात नियमावली तयार करण्याच्या सूचना गृह विभागाला देण्यात आल्या आहेत. सायबर सुरक्षेच्या दृष्टीने एक हजार लोकांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. त्यांचा उपयोग सायबर गुन्ह्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी केला जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. मुंबई पोलिस दलात सध्या मनुष्यबळाची टंचाई आहे. त्यामुळे तब्बल तीन हजार कंत्राटी पोलिसांची भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी गृहखात्याने तीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.