नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – घर लिलाव विक्रीचा आदेशाविरुद्ध निकाल बाजूने देण्यासाठी पाच लाखाची लाच मागणा-या विभागीय सहनिबंधक कार्यालयातील सहकार अधिकारी भिमराव यशवंत जाधव (४५) व वरिष्ठ लिपीक अनिल नथ्थुजी (५२) यांच्याविरुध्द मुंबई नाका पोलिस स्टेशन, नाशिक शहर येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७, १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार हे को- ऑप क्रेडिट सोसायटी चे क्लार्क असून सोसायटीचे नियमानुसार सभासद यांनी कर्ज भरले नाही म्हणून सभासद यांचे घर लिलाव विक्रीचा आदेशाविरुद्ध विभागीय सहनिबंधक कार्यालय,नाशिक येथे सभासद यांनी रिव्हिजन दाखल केली असून सदर प्रकरणाची चौकशी सदर कार्यालयात सुरू होती. सदर कार्यवाहीची निकाल तक्रारदार यांच्या को- ऑप क्रेडिट सोसायटीचे बाजूने देण्यासाठी आलोसे क्रमांक १ व २ यांनी तक्रारदार कडे ६ लाख रुपयाची मागणी केली तसेच ७ डिसेंबर व ८ डिसेंबर २०२३ रोजीचा पडताळणी कारवाईत तक्रारदार यांच्याकडे तडजोडी अंती ५ लाख रुपये लाचेची मागणी केली म्हणुन आलोसे क्रमांक १ व २ यांचेवर मुंबई नाका पोलिस स्टेशन, नाशिक शहर येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन १९८८ चे कलम ७, १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
*लाचेचा मागणीची सापळा कारवाई
*युनिट -* ला.प्र.वि. नाशिक
तक्रारदार- पुरुष, 33 वर्ष.
आलोसे -1) भिमराव यशवंत जाधव, वय- 45 वर्षे, व्यवसाय-नोकरी,सहकार अधिकारी, विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक विभाग,नाशिक पद-वर्ग 3.
2) श्री अनिल नथ्थुजी
घरडे, वय ५2 वर्षे, व्यवसाय-नोकरी, सहाय्यक सहकार अधिकारी/वरिष्ठ लिपिक विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक विभाग,नाशिक पद-वर्ग 3,
*लाचेची मागणी– 6,00,000/- (6 लाख रुपये) ची मागणी करून तडजोडी अंती 5,00,000/-( 5 लाख रुपये) मागणी केली.
*लाच स्वीकारली – Nil
*
लाचेचे कारण – यातील तक्रारदार हे को- ऑप क्रेडिट सोसायटी चे क्लार्क असून सोसायटीचे नियमानुसार सभासद यांनी कर्ज भरले नाही म्हणुन सभासद यांचे घर लिलाव विक्रीचा आदेशाविरुद्ध विभागीय सहनिबंधक कार्यालय,नाशिक येथे सभासद यांनी रिव्हिजन दाखल केली असून
सदर प्रकरणाची चौकशी सदर कार्यालयात सुरू होती. सदर कार्यवाहीची निकाल तक्रारदार यांच्या को- ऑप क्रेडिट सोसायटीचे बाजूने देण्यासाठी आलोसे क्रमांक 1 व 2 यांनी तक्रारदार कडे 6 लाख रुपयाची मागणी केली तसेच दि.7/12/2023 व दि.8/12/2023 रोजीचा पडताळणी कारवाईत तक्रारदार यांच्याकडे तडजोडी अंती 5 लाख रुपये लाचेची मागणी केली म्हणुन आलोसे क्रमांक 1 व 2 यांचेवर मुंबई नाका पोलिस स्टेशन, नाशिक शहर येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन 1988 चे कलम 7 , 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
*आलोसे यांचे सक्षम प्राधिकारी – विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक
*सापळा अधिकारी – निलिमा केशव डोळस, पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक*
*सापळा पथक- पोलीस नाईक संदीप हांडगे ,पोलीस नाईक सुरेश चव्हाण, सर्व नेमणूक ला.प्र.वि. नाशिक .