गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

इंदिरानगर आणि राणेनगर बोगद्यांची लांबी वाढविण्याकामी निविदा प्रक्रिया सुरू

by India Darpan
जानेवारी 31, 2024 | 8:42 pm
in स्थानिक बातम्या
0
hemant godse

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – इंदिरानगर, राणेनगर, दिपालीनगर, लेखानगर या महामार्ग लगतच्या भागातील वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी बोगद्यांच्या लांबी वाढविण्याच्या कामाची नॅशनल हायवे प्रशासनाकडून निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. इंदिरानगर येथील बोगद्याची लांबी वीस मिटरहून छत्तीस मिटर तर राणेनगर येथील बोगद्याची लांबी सत्तावीस मीटरवरून चौरेचाळीस मीटर इतकी होणार आहे.येत्या तीन महिन्यात निविदा विषयीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होणार असून पुढील दोन वर्षात बोगद्याची लांबी,रुंदी वाढवण्याचे काम पूर्ण होणार असल्याची माहिती खा.हेमंत गोडसे यांनी दिली आहे

राणेनगर आणि इंदिरानगर हे दोन्ही बोगदे नाशिक – मुंबई महामार्गावर आहेत.सिडको आणि नाशिक शहर यांना जोडणारे हे दोनही बोगदे आहेत.बोगद्याचा वरील बाजूस महामार्ग असून बोगदयांना समांतरही महामार्ग आणि दोन्ही बाजूस सव्हिसरोड आहेत.या ठिकाणी सकाळ-संध्याकाळ वाहतुकीची मोठी कोंडी होत असते.यावर मार्ग काढण्यासाठी खा.गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली नॅशनल हायवे प्रशासनाने बोगद्यांची लांबी आणि रूंदी वाढविण्यासाठी विशेष आराखडा तयार केला. सदरचा आराखडा मंजूर होवून या कामी निधी उपलब्ध होण्यासाठी खा.गोडसे यांनी वेळोवेळी केंद्रीयमंत्री ना.नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला.यातूनच ना.गडकरी यांनी काही महिन्यांपूर्वीच सत्तेचाळीस कोटीच्या निधीला मान्यता दिलेली आहे.

वाहतूक कोंडीची तीव्रता विचारात घेवून शक्य होईल तितक्या लवकर कामांची निविदा प्रक्रिया सुरू करावी यासाठी खा.गोडसे यांचा नॅशनल हायवेकडे सातत्याने प्रयत्न सुरूच होते.खा गोडसे यांच्या सततच्या प्रयत्नांना यश आले असून नॅशनल हायवेचे प्रोजेक्ट डायरेक्टर भाऊसाहेब साळुंखे,टेक्निकल मॅजेजर दिलीप पाटील यांच्या अभिपत्याखाली बोगद्यांची लांबी आणि रुंदी वाढविण्याच्या कामाचे निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे.निविदा दाखल करण्याची मुदत बारा फेब्रुवारीपर्यंत असणार आहे.आलेल्या निविदांची छाननी आणि त्यानंतर प्रशासकीय बाबींची पूर्तता करून घेवून मे महिन्यात प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होणार आहे.इंदिरानगर येथील बोगद्याची लांबी दोन्ही बाजूंनी आठ -आठ मीटरने वाढणार असून एकूण लांबी छत्तीस मीटर इतकी होणार आहे.रुंदी दहा मीटरहून पंचवीस मीटर होणार आहे. राणेनगर येथील बोगदयाची लांबी यापूर्वी सत्तावीस मीटर इतकी होती.आता दोन्ही बाजूंनी आठ -आठ मीटर वाढवून एकूण लांबी चौरेचाळीस मीटर इतकी होणार आहे. दोन वर्षात काम पूर्ण होणार असून या ठिकाणी कोंडीमुक्त सुरळीत वाहतूक होणार असल्याची माहिती खा.गोडसे यांनी दिली आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज्यातील ४४ पोलिस अधिका-यांच्या बदल्या…नाशिकचे बी.जी. शेखर, शहाजी उमाप यांची बदली

Next Post

शेतकरी उत्पादक संस्था स्थापण्यास व समूह संकलन केंद्र उभारणीस मान्यता

India Darpan

Next Post
new new logoooooo 3 1140x570 1 e1706122285555

शेतकरी उत्पादक संस्था स्थापण्यास व समूह संकलन केंद्र उभारणीस मान्यता

ताज्या बातम्या

State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011