मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लोकसभा निवडणुकी अगोदर राज्यातील ४४ पोलिस अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या आहे. त्यात नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी.जी. शेखर यांची सुध्दा बदली करण्यात आली असून त्यांच्या पदस्थापनेचा आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहे. त्यांच्या जागी ठाणे येथील सह पोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे नाशिक ग्रामीणचे शिवाजी उमाप यांची बदली मुंबईत अप्पर पोलिस आयुक्त म्हणून विशेष शाखेत झाली आहे. त्यांच्या जागी ठाणे येथील पोलिस अधिक्षक विक्रम देशमाने यांची नियुक्ती करण्यता आली आहे.
या सर्व राज्यातील अधिका-यांच्या बदल्या खालीलप्रमाणे आहे.