इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राज्याच्या सरकारी तिजोरीतील निधी हा काही सत्ताधाऱ्यांच्या राजकीय पक्षाचा निधी आणि खासगी मालमत्ता नाही. असे असताना विरोधी पक्षातील आमदारांना निधीचे वाटप का होत नाही? असा प्रश्न विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, सरकार आणि प्रशासन हे फक्त सत्ताधाऱ्यांच्या मतदारसंघात काम करणार का? विरोधकांच्या मतदारसंघातील जनतेचे प्रश्न हे सरकारचे प्रश्न नाहीत? विरोधकांचा सूड घेण्याच्या नादात सत्ताधारी भाजप आणि शिंदे सरकार मुंबईकरांवर कशाला सूड उगवत आहे.