इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणे : पुणे पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. या अंतर्गत ड्रगस माफिया ललित पाटीलच्या भावाला चक्क उत्तर प्रदेशात जाऊन अटक केल्याची माहिती पुढे आली आहे. प्राप्त माहितीनुसार, नाशिकमध्ये ड्रग्सचा कारखाना चालवणाऱ्या भूषण पाटीलला पुणे पोलिसांनी अटक केलीय. उत्तर प्रदेशातील वाराणसीमधून त्याला अटक करण्यात आलीय. भूषण पाटील हा ड्र्ग्स माफिया ललित पाटीलचा भाऊ आहे. नाशिकमध्ये भूषणचा ड्रग्स बनवण्याचा कारखाना होता. साकीनाका पोलिसांना याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत भूषण पाटीलचा कारखाना उद्धवस्त केला होता. पोलिसांनी या कारखान्याची चौकशी केली तेव्हा हा कारखाना ललित पाटीलचा भाऊ भूषण चालवता अशी माहिती मिळाली. यानंतर भूषण पाटीलला फरार होता. या प्रकरणात अभिषेक बलकवडे याला सुध्दा अटक करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबई, पुणे आणि नाशिक पोलीस ललित पाटील आणि भूषण पाटील याचा शोध घेत होते. त्यात भूषणला पुणे पोलिसांनी वाराणसीतून अटक केलीय. दरम्यान काही दिवसांपूर्वी साकीनाका पोलिसांनी नाशिकमधून ३०० कोटींचे ड्रग्स जप्त केले होते. त्या प्रकरणात हे आरोपी होते. ललित पाटील आणि भूषण पाटील हे एम डी ड्रग्स बनवत होते. भूषणने नाशिक येथील शिंदे पळसे परिसरात श्री. गणेशाय इंडस्ट्रीज या नावाने कंपनी चालू केली होती. का कारखान्यात तो ड्रग्सची निर्मिती होता. साकीनाका पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी हा कारखाना उद्धवस्त केला.
नाशिक पोलिसांनी केली होती झाडाझडती
दरम्यान काल नाशिक पोलिसांनी ललित पाटील याच्यासह त्याच्या तीनही आरोपींच्या घरांची झाडाझडती घेतली होती. पोलिसांनी या आरोपींच्या घरातून मोबाईल, इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस जप्त करत त्यातील डेटा मिळवण्याचा प्रयत्न पोलिसांनी काल केला होता. त्याचप्रमाणे एका ठिकाणी टाकलेल्या छाप्यात ५ कोटीच्या आसपास ड्रग्ज साहित्य जप्त केले होते.