नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात वेगवेगळया भागात झालेल्या घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी सुमारे पावणे दोन लाखाच्या ऐवज चोरुन नेला. या घरफोडीत चोरट्यांनी रोकडसह सोन्याचांदीचे दागिने लंपास केले. याप्रकरणी अंबड आणि इंदिरानगर पोलीस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिली घटना पाथर्डी फाटा भागात घडली. जितेंद्र गणपत प्रसाद (रा.विनायक अपा.अलकापुरी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. प्रसाद कुटुंबिय सोमवारी (दि.२९) बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेली ३० हजाराची रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे १ लाख १० हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत.
दुस-या घटनेत सिडकोतील सावतानगर भागात राहणारे प्रतिक कृष्णा पारतवार (रा.कालभैरव चौक) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पारतवार कुटुंबिय शनिवारी (दि.२७) बाहेरगावी गेलेले असतांना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून किचनमध्ये ठेवलेल्या लोखंडी कपाटातून रोकडसह सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ७२ हजाराचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक संगम करीत आहेत.