नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सातबारा उताऱ्यावरील नोंद प्रमाणित करण्यासाठी २५ हजाराची लाच घेतांना येवला तालुक्यातील राजापूर येथील मंडळ अधिकारी मनोहर अनिल राठोड (३३) हे लाच लुचपत विभागाच्या जाळयात अडकले. पंचांसमक्ष २५ हजार रुपयांची लाचेची मागणी करून ती लाचेची रक्कम पंचांसमक्ष येवला येथे स्वीकारली म्हणून त्यांना रंगेहात पकडण्यात आलेले आहे. .
या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार हे येवला तालुक्यातील राजापूर येथील शेतकरी असून त्यांनी विकत घेतलेल्या राजापूर येथील गट क्रमांक १४२/२/ब येथील २५ गुंठे जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर येवला तालुक्यातील मौजे राजापूर तलाठी यांनी दिनांक ४/१/२४ रोजी तक्रारदार यांच्या मालकी हककाबाबत नोंद घेतली होती. व मंडळ अधिकारी या नात्याने ती नोंद प्रमाणित करण्यासाठी राजापूर मंडळ अधिकारी राठोड यांनी तक्रारदार यांचेकडे पंचांसमक्ष २५ हजार रुपयांची लाचेची मागणी करून ती लाचेची रक्कम पंचांसमक्ष येवला येथे स्वीकारली म्हणून त्यांना रंगेहाथ पकडण्यात आलेले आहे .
यशस्वी सापळा अहवाल
*युनिट – नाशिक
*तक्रारदार- पुरुष वय- 37 रा राजापूर ता येवला, जि. नासिक
*आरोपी – १) मनोहर अनिल राठोड वय 33 वर्ष व्यवसाय नोकरी, मंडळ अधिकारी, राजापूर तालुका येवला राहणार विठ्ठल नगर, येवला जिल्हा नाशिक
*लाचेची मागणी- 25000/ –
*लाच स्विकारली – 25,000/-
*लाच मागणी दिनांक – 30/1/2024
*लाच स्विकारली दिनांक – 31/1/2024
लाचेचे कारण -. तक्रारदार हे येवला तालुक्यातील राजापूर येथील शेतकरी असून त्यांनी विकत घेतलेल्या राजापूर येथील गट क्रमांक १४२/२/ब येथील २५ गुंठे जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर येवला तालुक्यातील मौजे राजापूर तलाठी यांनी दिनांक ४/१/२४ रोजी तक्रारदार यांच्या मालकी हककाबाबत नोंद घेतली होती. व मंडळ अधिकारी या नात्याने ती नोंद प्रमाणित करण्यासाठी राजापूर मंडळ अधिकारी राठोड यांनी तक्रारदार यांचेकडे पंचांसमक्ष 25000/- रुपयांची लाचेची मागणी करून ती लाचेची रक्कम पंचांसमक्ष येवला येथे स्वीकारली म्हणून त्यांना रंगेहाथ पकडण्यात आलेले आहे .
*सापळा अधिकारी: अनिल बडगुजर, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र. वि. नासिक
*सापळा पथक – पोहवा प्रभाकर गवळी, पोशि संजय ठाकरे