मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा च्या वतीने माध्यमांमध्ये पक्षाची अधिकृत भूमिका मांडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी १४ प्रवक्त्यांची नियुक्ती जाहीर केली आहे.
प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांनी सांगितले की,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत भूमिका मांडण्यासाठी एकूण १४ प्रवक्त्यांची टीम जाहीर केली आहे. यामध्ये राज्याचे मुख्य प्रवक्ते म्हणून उमेश पाटील तर राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून अविनाश आदिक आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव यांची निवड करण्यात आली आहे. तर प्रदेश प्रवक्ते म्हणून ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे,आमदार अमोल मिटकरी, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, संजय तटकरे, मुकेश गांधी, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, रुपालीताई ठोंबरे, प्रशांत पवार, मुजीब रुमाणे, वरीष्ठ पत्रकार ताराचंद म्हस्के पाटील, सायली दळवी आदींचा समावेश आहे. ही सर्व टीम पक्षाची अधिकृत भूमिका वेळोवेळी माध्यमापुढे मांडण्याचे काम करेल असे खा.सुनील तटकरे म्हणाले.