नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अंबड औद्योगिक मॅन्यूफॅक्चर असोसिएशनच्या २५ कार्यकारिणी सदस्य पदासाठी झालेल्या निवडणुकीत एकता पॅनलने एकतर्फी विजय नोंदवत संस्थेवर आपले वर्चस्व अबाधीत ठेवले. याअगोदरच या निवडणुकीत प्रमुख पदाधिकारी बिनविरोध निवडणून आले आहे. फक्त २५ कार्यकारिणी सदस्यांसाठी ही निवडणूक होती. त्यात अनिल आमले यांनी विरोधात अर्ज भरल्यामुळे ही निवडणूक झाली त्यात एकताचे सर्व सदस्य निवडून आले.
मंगळवारी मतदान झाल्यानंतर बुधवारी मतमोजणी झाली. त्यात सत्ताधारी एकता पॅनलची आपली सत्ता राखत दणदणीत विजय मिळवला. या निवडणुकीत अनिल आमले यांनी एकाकी झुंज देत १६४ मते मिळवली. पण, त्यांचा पराभव झाला. या निवडणुकीसाठी ८९८ मतदान झाले त्यात १५ मते बाद झाली.
याअगोदर बिनविरोध निवडणून आलेले पदाधिकारी
अध्यक्ष – ललित बुब
उपअध्यक्ष – राजेंद्र पानसरे.
जनरल सेक्रेटरी प्रमोद वाघ.
खजिनदार – गोविंद झा.
सह सेक्रेटरी – हर्षद बेळे
सह सेक्रेटरी – योगिता आहेर.
…
आता विजयी झालेले कार्यकारिणी सदस्य
उमेदवारांचे नाव – मिळालेली मत
जितेंद्र आहेर – ८०१
जयदीप अलिमचंदानी- ७९५
अनिल आमले – १६४
बजाज सुमीत – ७९१
अविनाश बोडके – ७९९
स्वेता चाडंक – ८००
कुदंन धारंगे – ७९७
विराज गडकरी – ७९२
राहुल गागुर्डे – ७९२
हेमंत खोडं – ७९७
उमेश कोठावदे – ८०४
विनोद कुंभार – ७९८
रविंद्र महादेवकर – ८०४
अविनाश मराठे – ८०२
जयंत पगार – ७९६
श्रीलाल पांडे – ७८०
जगदीश पाटील – ७९७
करनसिंग पाटील – ७९०
मनिष रावल – ८०५
रवी शामदासानी – ८०१
धिरज वडनेरे – ७९१
डी.विभुते – ७८९
दिलीप वाघ – ८०१
अजय यादव – ७६८
रविंद्र झोपे – ७७५