इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
कोलकात्ताः काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय’ यात्रा सुरू असताना त्यांच्या कारवर हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात त्यांच्या कारच्या काचा फुटल्या असून, ते मात्र थोडक्यात बचावले. पश्चिम बंगालमधील मालदा येथे राहुल गांधींच्या ताफ्याला लक्ष्य करण्यात आले. हा हल्ला कोणी केला हे मात्र अजून समोर आलेलेल नाही.
या घटनेत राहुल ज्या कारमधून जात होते, त्या कारच्या काचा फोडण्यात आल्या. या वेळी झालेल्या दगडफेकीत कोणाला दुखापत झाली आहे का, याची माहिती उपलब्ध झाली नाही. बिहारमधील कटिहार येथून निघून राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली न्याय यात्रा बुधवारी सकाळी ११.३० च्या जाण्याच्या सुमारास मालदामार्गे पश्चिम बंगालमध्ये दाखल झाली. त्यावेळेस हा हल्ला झाला. शहराच्या मुख्य रस्त्यांवरून हळूहळू जात असलेल्या स्पोर्टस् युटिलिटी व्हेइकलच्या (एसयूव्ही) छतावर राहुल गांधी बसले होते.