इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका ओबीसी वेल्फेअर फाऊंडेशनच्या ॲड. मंगेश ससाणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सगेसोयरे व गणगोत यांच्या प्रतिज्ञापत्राद्वारे कुणबी दाखले देण्यासाठी राज्य सरकारने २६ जानेवारी रोजी काढलेल्या अधिसूचनेला या याचिकेतून आव्हान देण्यात आले आहे.
या याचिकेत संविधानाच्या विरोधात जाऊन सगेसोयऱ्यांची व्याख्या बदलण्याचा निर्णय रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे. जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने सगेसोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला. राज्य सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात ओबीसी संघटना आक्रमक झाल्या आहे. त्यात ही याचिका आता दाखल झाली आहे.
राज्य सरकारच्या अधिसूचनेवर हरकती घेण्यासाठी १५ तारखेपर्यंतची मुदत असताना त्याअगोदरच उच्च न्यायालयात धाव घेण्यात आल्यामुळे या याचिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान जरांगे यांनी राज्य सरकारने नऊ तारखेपर्यंत सगेसोयऱ्याच्या कायद्याची केली अंमलबजावणी केली नाही, तर दहा तारखेपासून उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.