नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष अरविंद पनगढ़िया यांच्या अध्यक्षतेखाली सोळाव्या वित्त आयोगाची ३१ डिसेंबर रोजी स्थापना करण्यात आली होती . राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर खालील सदस्यांची आयोगावर नियुक्ती करण्यात आली आहे.
१) अजय नारायण झा, 15 व्या वित्त आयोगाचे माजी सदस्य,आणि माजी व्यय सचिव, पूर्णवेळ सदस्य
२) ॲनी जॉर्ज मॅथ्यू, माजी विशेष सचिव (व्यय), पूर्णवेळ सदस्य
३) डॉ. निरंजन राजाध्यक्ष, अर्थ ग्लोबलचे कार्यकारी संचालक, पूर्णवेळ सदस्य
४) डॉ. सौम्या कांती घोष, भारतीय स्टेट बँक समूहाच्या मुख्य आर्थिक सल्लागार, अर्धवेळ सदस्य
आयोगाच्या कार्यविषयक संदर्भ अटी ३१ डिसेंबर रोजी अधिसूचित करण्यात आल्या होत्या. सोळाव्या वित्त आयोगाला १ एप्रिल २०२६ पासून सुरू होणाऱ्या पुढच्या ५ वर्षांच्या कालावधीसाठी त्यांच्या शिफारशी ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात आली आहे.