नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन आणि व्ही. डी.के. स्पोर्ट्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ०३ व ०४ फेब्रुवारी, २०२४ रोजी स्व.मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल, हिरावाडी, पंचवटी, नाशिक येथील सिंथेटिक ट्रॅकवर नाशिक जिल्हा कॅडेट, मिनी आणि सब ज्युनिअर गटाच्या ॲथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेत ०६ वर्ष, ०८ वर्ष, १० वर्ष, १२ वर्षे, १४ वर्षे व १६ वर्ष या सहा वयोगटाच्या मुले आणि मुलींचा समावेश असणार आहे. या सर्व वयोगटामधून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची नाशिक जिल्ह्याच्या संघामध्ये निवड केली जाणार आहे. हे निवड झालेले खेळाडूं सांगली येथे होणाऱ्या राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करतील. या राज्यस्तरीय स्पर्धा दिनांक ०८ ते ११ फेब्रुवारी २०२४ रोजी होणार आहेत.
या जिल्हास्तरीय स्पर्धांसाठी प्रवेश अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ०१ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ०७ वाजेपर्यंत आहे. प्रवेश अर्ज व नाव नोंदणी सी.एम.सी.एस कॉलेज, प्रसाद मंगल कार्यालय समोर, गंगापूर रोड, नाशिक आणि साई स्पोर्ट्स, कॅनडा कॉर्नर,नाशिक येथे करावी. स्विकारण्यात येईल. या स्पर्धेच्या माध्यमातून शहरी तसेच खेड्यापाड्यातील लहान मुलांची गुणवत्ता हेरून त्यांना उच्चस्तरीय स्पर्धोंसाठी आणि प्रशिक्षणासाठी तयार करणे आणि या वयातच खेळाडूंची गुणवत्ता उंचावून जास्तीत जास्त राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू घडावेत हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे त्यामुळे या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवहान नाशिक जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष हेमंत पांडे, सचिव सुनील तावरगिरी, प्रशिक्षक वैजनाथ काळे, संदीप फुगट यांनी केले आहे.