सोमवार, ऑगस्ट 4, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नेत्रदीपक पॅराड्रॉप प्रदर्शन…१०० हून अधिक पॅराड्रपर्सने मुक्तपणे घेतली उडी

by Gautam Sancheti
जानेवारी 31, 2024 | 12:04 am
in राष्ट्रीय
0
WhatsAppImage2024 01 30at4.39.33PMOBK9 e1706639666820

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पुण्यातला दिघी हिल्स परिसर, आज द बॉम्बे सॅपर्सच्या सेवारत आणि माजी सैनिकांच्या पॅराजंपच्या चित्तथरारक प्रदर्शनाची साक्षीदार ठरला. बॉम्बे सॅपर्स समूहाच्या प्रतिष्ठित युद्ध स्मारकाला १०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त, सात माजी सैनिकांसह विशिष्ट ४११ (स्वतंत्र) पॅरा फील्ड कंपनीचे १०० हून अधिक पॅराड्रपर्सने स्थिररेषेत मुक्तपणे उडी घेतली आणि संपूर्ण बॉम्बे सॅपर समूहाला एकत्र आणणाऱ्या चार वर्षांनी होणाऱ्या स्नेहसंमेलन कार्यक्रमांची सुरुवात केली.

अधिकारी आणि सैन्याने एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून केलेल्या हिंमत आणि धैर्याच्या या धाडसी प्रदर्शनाच्या माध्यमातून राष्ट्राची सुरक्षा आणि संरक्षण सक्षम हातात असल्याची ग्वाही दिली. सेवारत कर्मचारी सुरक्षित वर्तमानाचे आणि भविष्यातील चांगल्या विचारांचे, प्रतिनिधित्व करत असताना, ७५ वर्षांचे माजी अभियंता-इन-चीफ, लेफ्टनंट जनरल आरआर गोस्वामी यांच्या नेतृत्वाखालील माजी सैनिक द बॉम्बे सॅपर्सच्या अतुलनीय धैर्याचे आणि कोणत्याही परिस्थितीत सेवा देण्याच्या संकल्पाचे प्रतीक आहे. वयाच्या मर्यादेवर मात करत, ७४ वर्षांचे ब्रिगेडियर एसआर माजगावकर, ६६ वर्षांचे ब्रिगेडियर आरजी दिवेकर आणि 61 वर्षांचे माजी केंद्रीय लष्करी कमांडर लेफ्टनंट जनरल योगेंद्र डिमरी या उल्लेखनीय शौर्य प्रदर्शनात सहभागी झाले.

पॅराट्रूपर्ससोबत पॅरामोटर वैमानिक होते ज्यांनी नुकतेच युद्ध संग्रहालयाच्या शताब्दीच्या निमित्ताने पूर्व-पश्चिम कच्छ ते किबिथू पॅरामोटर मोहीम पूर्ण केली आहे. पॅरामोटर्सनी निम्नस्तरावरील उड्डाण आणि कसरतीने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. बॉम्बे सॅपर्ससाठी प्रशिक्षण क्षेत्र असेलल्या दिघी हिल्समध्ये पारंपरिक गटका आणि मलखांबच्या कसरतींनीही प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. यामध्ये सेवारत आणि माजी अधिकारी, जेसीओ आणि इतर पदांवरील कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबांव्यतिरिक्त असंख्य शाळा आणि महाविद्यालयीन मुलांचा समावेश होता.

बीईजी प्रशिक्षकांनी दाखवलेल्या उत्साहवर्धक शारीरिक प्रशिक्षण प्रदर्शनाने कसरतींमधील चपळता आणि सफाईदारपणा बघतांना प्रत्येकाने श्वास रोखून धरला होता. बीईजी कमांडंट ब्रिगेडियर दिलीप पटवर्धन यांनी उडी पूर्ण केल्यावर, युद्ध स्मारकाचे महत्त्व सांगितले आणि श्रद्धास्थान म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो ते स्मारक त्याग, शौर्य आणि निःस्वार्थ सेवेचे प्रतीक आहे, असे ते म्हणाले. द बॉम्बे सॅपर्सचे बोधचिन्ह असणारे हे स्मारक फेब्रुवारी १९२३ मध्ये उभारण्यात आले आणि नुकतेच राष्ट्रासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या बॉम्बे सॅपर्सच्या शूरवीरांच्या नावांचा समावेश करण्यासाठी त्याचा विस्तार करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.

टेकड्यांचे निसर्गरम्य वातावरण आणि जवळचा गुरनाम तलाव , ज्यांनी निर्विवादपणे आपल्या भविष्यासाठी आपला वर्तमानाचा त्याग केला आहे त्या वास्तविक जीवनातील नायकांच्या आनंदाचे आणि आनंदोत्सवाचे आज साक्षीदार ठरले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आता केंद्रीय सहकार मंत्रालय देशातील प्रत्येक गावापर्यंत असे पोहोचेल…या योजनेची सुरुवात

Next Post

आजपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन….खासदारांचे निलंबनाबाबतही होणार निर्णय

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
sansad11

आजपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन….खासदारांचे निलंबनाबाबतही होणार निर्णय

ताज्या बातम्या

Show e1754275627463

नाशिक येथे या तारखेला महावितरणच्या राज्यस्तरीय नाट्यस्पर्धा…नाट्यरसिकांना दोन दिवस मेजवानी

ऑगस्ट 4, 2025
image0042EZO

या तीन नवीन एक्स्प्रेस गाड्या सुरु….रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दाखवला हिरवा झेंडा

ऑगस्ट 4, 2025
cbi

मुंबईत सीमाशुल्क अधीक्षकाला १० लाख २० हजाराची लाच घेताना सीबीआयने केली अटक

ऑगस्ट 4, 2025
Untitled 3

अवयवदान पंधरवड्यास सुरुवात; राज्यात जनजागृतीपर विविध उपक्रम

ऑगस्ट 4, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी विनाकारण वादात पडू नये, जाणून घ्या, सोमवार, ४ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 4, 2025
Untitled 2

ग्रामसेवकाला थेट कानाखाली मारण्याची राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची धमकी…नेमकं घडलं काय

ऑगस्ट 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011