नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिन्नर येथील भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी सूर्यभान मुरलीधर निंबाळकर (५८) हे ७०० रुपयाची लाच घेतांना रंगेहात एसीबीच्या जाळ्यात सापडले. सिन्नर येथे मौजे पिंपरवाडी सर्वे नं १५४/७ गट स्कीम उतारा, गट नकाशा व पोट हिस्सा नकाशा नकला काढून देण्यासाठी ही लाच मागितली होती. ती स्विकारतांना ते सापडले. त्यांच्याविरुध्द सिन्नर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांनी भूमी अभिलेख कार्यालय सिन्नर येथे मौजे पिंपरवाडी सर्वे नं १५४/७ गट स्कीम उतारा, गट नकाशा व पोट हिस्सा नकाशा नकला काढून देण्यासाठी २५ जानेवारी रोजी अर्ज केला होता. त्या अनुषंगाने आज ३० जानेवारी रोजी तक्रारदार हें उपअधीक्षक भूमि अभिलेख कार्यालय येथे गेले. येथे लोकसेवक यांनी तक्रारदार यांच्याकडे ७०० रुपये लाचेची मागणी करून पंचासमक्ष ७०० रुपये लाचेची रक्कम स्वीकारली. त्यावेळी त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. सिन्नर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
युनिट – नाशिक
तक्रारदार- पुरुष वय- 28
आरोपी -सूर्यभान मुरलीधर निंबाळकर वय 58वर्षे धंदा नोकरीं पद दप्तर बंद, भूमी अभिलेख कार्यालय, सिन्नर जि नाशिक
*लाचेची मागणी 700/ रुपये
*लाच स्विकारली – 700/- रुपये
*लाच मागणी व लाच स्विकारली दिनांक -30/1/2024
लाचेचे कारण –.तक्रारदार यांनी भूमी अभिलेख कार्यालय सिन्नर येथे मौजे पिंपरवाडी सर्वे नं 154/7 गट स्कीम उतारा, गट नकाशा व पोट हिस्सा नकाशा नकला काढून देण्यासाठी दिनांक 25/1/2024 रोजी अर्ज केला होता त्या अनुषंगाने आज 30/01/2024रोजी तक्रारदार हें उपअधीक्षक भूमि अभिलेख कार्यालय येथे गेले असता लोकसेवक यांनी तक्रारदार यांच्याकडे 700/रुपये लाचेची मागणी करून पंचासमक्ष 700 रुपये लाचेची रक्कम स्वीकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले असून सिन्नर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सापळा अधिकारी:-वैशाली पाटील, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र. वि. नाशिक
सापळा पथक –* पोहवा शरद हेंबाडे, पोहवा प्रफुल्ल माळी