नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात १४ हजार रुपयाची लाच घेतांना खासगी व्यक्ती (पंटर) जाळ्यात अडकला आहे. रितेश पवार, वय ३० वर्षे, रा. पाटण ता शिंदखेडा जि. धुळे. असे जाळ्यात अडकलेल्या खासगी व्यक्तीचे नाव आहे.
या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, कौटुंबिक जमिनीची वाटणी करावयाची असल्याने खातेफोड होणेबाबत त्यांनी तहसील कार्यालय, शिंदखेडा येथे विनंती अर्ज सादर केला होता. त्या अनुषंगाने तक्रारदार यांनी वेळोवेळी नायब तहसीलदार, शिंदखेडा यांच्याशी भेटून खातेफोड कामी पाठपुरावा सुरू केला असता यातील आरोपी खाजगी इसम (पंटर) यांनी तक्रारदार यांची भेट घेऊन त्यांची नायब तहसीलदार तसेच तहसील कार्यालयातील इतर कर्मचारी यांची ओळख व प्रभाव असल्याचे सांगून त्यांना देण्याकरिता पंचांसमक्ष २० हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती ठरलेली १४ हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात मिळून आले म्हणून त्यांचे विरुद्ध शिंदखेडा पोलीस स्टेशन जिल्हा धुळे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
लाचेचा यशस्वी सापळा कारवाई
युनिट – ला.प्र.वि. धुळे.
तक्रारदार- पुरुष, 47 वर्ष.
आरोपी खाजगी इसम – रितेश पवार, वय 30 वर्षे, रा. पाटण ता शिंदखेडा जि. धुळे.
*लाचेची मागणी- 20,000 /- रुपये तडजोडी अंती – 14000/-दिनांक 06/10/2023
*लाच स्वीकारली – 14,000 /- रुपये दिनांक 10/10/2023
*लाचेचे कारण – यातील तक्रारदार कौटुंबिक जमिनीची वाटणी करावयाची असल्याने खातेफोड होणेबाबत त्यांनी तहसील कार्यालय, शिंदखेडा येथे विनंती अर्ज सादर केला होता. त्या अनुषंगाने तक्रारदार यांनी वेळोवेळी नायब तहसीलदार, शिंदखेडा यांच्याशी भेटून खातेफोड कामी पाठपुरावा सुरू केला असता यातील आरोपी खाजगी इसम (पंटर) यांनी तक्रारदार यांची भेट घेऊन त्यांची नायब तहसीलदार तसेच तहसील कार्यालयातील इतर कर्मचारी यांची ओळख व प्रभाव असल्याचे सांगून त्यांना देण्याकरिता पंचांसमक्ष २० हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती ठरलेली १४ हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात मिळून आले म्हणून त्यांचे विरुद्ध शिंदखेडा पोलीस स्टेशन जिल्हा धुळे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
*पर्यवेक्षण अधिकारी – अभिषेक पाटील, पोलीस उपअधीक्षक,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे.
*सापळा अधिकारी – मंजितसिंग चव्हाण, पोलीस निरीक्षक,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे.
*सहा.सापळा अधिकारी – रुपाली खांडवी, पोलीस निरीक्षक,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे.
*सापळा पथक*- पो. हवा. राजन कदम, मुकेश अहिरे, पोना प्रवीण मोरे,पो.ना. संतोष पावरा, मकरंद पाटील, चालक पोहवा सुधीर मोरे.