नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने दर दोन वर्षानी देण्यात येणार गोदावरी गौरव पुरस्कार विविध क्षेत्रातील सहा मान्यवरांना जाहीर करण्यात आला. त्यात विवेक सावंत (ज्ञान), डॅा.सुचेता भिडे -चापेकर (नृत्य), सुनंदन लेले (क्रिडा), शामसुदीन तांबोळी (लोकसेवा ), आशुतोष गोवारीकर (चित्रपट), प्रमोद तांबोळी यांना जाहीर झाला आहे.
पुरस्काराचे स्वरूप स्मृतीचिन्ह ,सन्मानपत्र व २१ हजार रूपये आहे. या पुरस्काराचे वितरण १० मार्च २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता गुरूदक्षिणा सभागृह येथे होणार आहे.