नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिक पुणे रोडवरील इच्छामणी लॉन्स गार्डन भागात गावठी कट्टा विक्रीसाठी आलेल्या दोघांपाठोपाठ त्याच्या एका साथीदारास पोलीसांनी गजाआड केले. या संशयितांच्या ताब्यातून दोन पिस्तूल, जीवंत काडतुसे व दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे. शुभम अशोक जाधव व सचिन धर्मा सोनवणे (रा.सोनवणे बाबा चौक,समतानगर) व गणेश जगदिश भालेराव उर्फ बॉबी (२४ रा.सिध्दार्थ किराणा जवळ,समतानगर)अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात शस्त्रबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत समजलेली हकीकती अशी की, इच्छामणी लॉन्स गार्डन भागात दोन तरूण गावठी कट्टा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती उपनगर पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार रविवारी (दि.२८) सायंकाळी सापळा लावण्यात आला होता. एमएच १५ जेजे १७८८ आलेल्या जाधव व सोनवणे या दोघांची पोलीसांनी झडती घेतली असता त्यांच्या ताब्यात गावठी कट्यासह जीवंत काडतुसे आढळून आले. अधिक तपास त्यांनी बॉबी भालेरावचे नाव उघड केल्याने त्यास ताब्यात घेतले असता त्याच्याकडेही एक गावठी कट्टा मिळून आला.
या प्रकरणाचा अधिक तपास हवालदार इम्रान शेख करीत आहेत. ही कारवाई उपनगरचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे व बाबासाहेब दुकळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक चौधरी,हवालदार लखन,इमरान शेख,शिपाई जयंत शिंदे अनिल शिंदे,सुरज गवळी,पंकज कर्पे, राहूल जगताप,सौरभ लोंढे व संदेश रगतवान करीत आहेत. याबाबत उपनगरचे अंमलदार शिंदे यांनी फिर्याद दिली आहे.