इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
रशियाच्या ट्रव्हल फिल्म इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलसाठी ‘लालपरी – अ रोड फेरी’ या डॉक्युमेंट्रीची निवड झालेली आहे. ही डॉक्युमेंटरी आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांसाठी मॉस्को, रशिया येथील चित्रपटगृहांमध्ये २ आणि ३ मार्च २०२४ रोजी दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लाल परिचा हा प्रवास जागतिक पातळीवर दिसणार आहे.
रशियाच्या ट्रव्हल फिल्मचा हा फेस्टिव्हल जगभर प्रसिध्द असून त्यात प्रवास ही संकल्पना घेऊन जगभरातील प्रवास विषयांवर आधारित डॉक्युमेंट्री या महोत्सवासाठी निवडल्या जातात. त्यात आता लालपरीची भर पडली आहे. ग्रामीण भागाची लाइफलाइन असलेली एसटी बस सर्वांना माहित आहे. पण, तीची डॅाक्युमेंटरी फिल्म करुन ती पडद्यावर दाखवणे सोपे नाही. ती किमया केल्यामुळे लालपरीने देशाच्या सीमा ओलांडल्या आहे.
त्यामुळे दिग्दर्शक संतोषी मिश्रा म्हणाले, आमच्यासाठी आणि टीमसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये निवड होणे आणि थिएटरमध्ये प्रदर्शन होणे म्हणजे एकप्रकारे पुरस्कार मिळाल्यासारखेच आहे.
हे आहे फिल्मध्ये
लालपरी राज्याची ग्रामीण अर्थव्यवस्था कशाप्रकारे चालवते हे या डॉक्युमेंट्रीमध्ये ज्येष्ठ पत्रकार, दिग्दर्शिका संतोषी गुलाबकाली मिश्रा यांनी दाखवले आहे. एसटी बस ही केवळ ग्रामीण महाराष्ट्राची वाहतूक नसून त्यांची जीवनरेखा आहे. अवघड परिस्थितीत एसटी आपली वाहतूक चालवते. महिला, शेतकरी, व्यापारी, छोटे व्यावसायिक, सरकारी नोकर, शाळकरी मुले, विशेषत मुली, फ्रंटलाईन वर्कर, शिक्षक आणि ज्येष्ठ नागरिक यांचे जीवन एसटी बसवर किती अवलंबून आहे हे डॉक्युमेंटरी अधोरेखित करते. नंदुरबार, धुळे जिल्हा व मेळघाटाचा परिसर येथे डॉक्युमेंटरीचे चित्रीकरण करण्यात आले आहे.