नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पोलिसांनी खासगी क्लासमधून चोरीस गेलेला मोबाईल पोलीसांच्या समुपदेशनामुळे अवघ्या काही तासात शोधून काढला. चोरी करण्याचे दुष्परिनाम, करिअरवर होणारा परिणाम याबाबतचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिल्याने मोबाईल बाथरूममध्ये आढळून आला. मोबाईल हाती पडताच मोबाईलधारक मुलीनेही आनंद आश्रुना वाट मोकळी करून दिली. मात्र चोरटा हाती लागला नसला तरी पोलीसी खाक्या दाखविणा-या पोलीसांकडून एका चोरट्यास (विद्यार्थी) चोरीच्या गुन्ह्यापासून परावृत्त केल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले.
सरकारवाडा पोलीसांच्या हद्दीत असलेल्या खाजगी क्लासमध्ये शिकवणी साठी आलेल्या अकरावीतील विद्यार्थीनीचा रविवारी (दि. २८) मोबाईल चोरीस गेला. लंचब्रेकमुळे मुलगी बाहेर गेली असता वर्गात ठेवलेल्या तिच्या सॅगमधील (पिशवीतून) मोबाईल गायब झाला. ही घटना पुन्हा वर्गात आल्यानंतर मुलीच्या ही बाब निदर्शनास आली. मुलीने सर्वत्र शोध घेवून शिक्षक आणि पालकांना घटनेची माहिती दिली. त्यानुसार विद्याथीर्नीसह सर्वांनी बाथरुमसह वर्गात मोबाईलची शोधाशोध केली. क्लासमधील सर्वांना विचारुनही मोबाईल सापडत नसल्याने अखेर विद्यार्थिनी तक्रार देण्यासाठी आईसह पोलीस ठाण्यात आली.
यावेळी वरिष्ठ निरीक्षक सुरेश आव्हाड यांनी अंमलदार निलेश वायंकडे, निलम चव्हाण, संदीप सोनावणे यांना हे प्रकरण तडिस नेण्याची जबाबदारी सोपविली. पथकाने क्लासमध्ये जावून संस्थाचालकांसह विद्यार्थ्यांना चोरीचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता, वगार्तील दोनशे विद्यार्थ्यांपैकीच कोणीतरी मोबाईल घेतला असण्याची शक्यता आणि विद्यार्थ्याकडे मोबाईल मिळून आल्यास त्याच्या करिअरवर होणारा दुष्परिणाम या सर्व गोष्टींची जाणीव करून दिली. त्यामुळे ज्या अज्ञात विद्याथ्यार्ने मोबाईल चोरला, त्याने तो लपून छपून बाथरुममध्ये जात ठेऊन दिला. यावेळी उपनिरीक्षक पाटील यांनी तांत्रिक विश्लेषणाचे आधारे हा मोबाईल बाथरूममधून हुडकून काढला.