सोलापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– लहान मुले मोबाईलचा वापर जास्त करत असल्यामुळे त्याचे परिणाम गेल्या काही दिवसात समोर येऊ लागले आहे. त्यामुळे पालकांचा संतापही होतो. त्यावेळेस ते लहान मुलांना शिक्षाही करतात. पण, त्याचा जीव कोणी घेत नाही. सोलापूरमध्ये मात्र मुलाने मोबाईलवर नको ते पाहिल्याने जन्मदात्याने १४ वर्षीय मुलाचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विजय सिद्राम बट्टू असे आरोपीचे नाव असून जीव गेलल्या मुलाचे नाव विशाल आहे.
विशेष म्हणजे मुलाचा जीव घेतल्यानंतर १५ दिवसाने ही घटना उपघडकीस आली. पोलिसांनी प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला. त्यात संशयाची सुई वडिलांकडे गेली. त्यानंतर कसून चौकशी केल्यानंतर विजयने कबुली दिली. सोलापुरातल्या जोडभावी पेठ पोलिसांनी विजयला ताब्यात घेतले आहे. विशालच्या सततच्या शाळेतील खोडकरपणाला वैतागून मोबाइलवर नको त्या गोष्टी पाहिल्याने विजयने मुलाचा खून केला. त्याने रागाच्या भरामध्ये मुलाला थम्सअपमध्ये सोडियम नायट्रेट्ची पावडर दिली.
बेशुध्द अवस्थेतल सापडला विशाल
विशाल सकाळपासून घरी न आल्यामुळे आई, वडील आणि नातेवाइकांनी पोलिस स्थानकात तक्रार दिली. त्याच दिवशी रात्री ११ च्या सुमारास पोलिसांना सोलापुरातल्या तुळजापूर नाका परिसरात एक मुलगा बेशुद्ध अवस्थेत सापडला. पोलिसांनी त्याला उपचारासाठी दाखल केले; मात्र उपचारपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर हा विशाल झाल्याचे समोर आले.