नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्रातर्फे तेवीस वर्षांखालील महिला क्रिकेट संघातर्फे खेळताना, नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या रसिका शिंदेने अष्टपैलु तर साक्षी कानडी व ईश्वरी सावकार यांनी बिहार वरील विजयात फलंदाजीची चमक दाखवली.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआय तर्फे २३ वर्षांखालील महिलांसाठी एकदिवसीय सामन्यांची स्पर्धा सुरू आहे. बिहारने प्रथम फलंदाजी करताना ३५ षटकांत ५ बाद १२६ धावा केल्या रसिका शिंदेने १ गडी बाद केला. विजयासाठी १२७ धावांचा पाठलाग करताना रसिकाने अष्टपैलु चमक दाखवत १४ चेंडूत नाबाद १८ धावा करत २८.३ षटकांत महाराष्ट्राला ५ गडी राखून विजय मिळवून दिला.
साक्षी कानडीने १९ व ईश्वरी सावकारने १३ धावा केल्या. लखनौ येथेच ३० जानेवारी रोजी महाराष्ट्राचा सामना केरळशी होणार आहे.