इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सदोष सरकारी नोकर भरती मधील पेपरफुटीचे सबळ पुरावे देऊनसुद्धा राज्य सरकारने काही प्रतिसाद दिलेला नाही. याउलट सरकारने सदोष तलाठीभरतीचा सदोष निकाल ७ दिवसांपूर्वी लावला आहे. राज्यभरातून हजारो विद्यार्थ्यांचे फोन, मेसेजेस येत आहेत.
आम आदमी पार्टी विद्यार्थ्यांना व आपल्या मागण्यांना समर्थन देणाऱ्या संघटनांना सोबत घेऊन मंगळवार ३० जानेवारी रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी संविधनिक मार्गाने, सदोष नोकर भरती प्रक्रियेच्या विरोधात, राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी बेरोजगार आक्रोश आंदोलन करणार आहोत.
या आंदोलनात जिल्ह्यातील सर्व गावे, पंचायत क्षेत्र, नगरपालिका व महानगरपालिका क्षेत्रातील सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनात सहभागी होणार आहेत.