इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्याच्या वनडे मालिका मधील दुसरा सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवला. भारताने ४०० धावांचे आव्हान ऑस्ट्रेलिया दिले होते.पण, पाऊस आल्यामुळे ३३ षटकात ३१७ धावांचे टार्गेट दिले होते. हे टार्गेट पार करतांना ऑस्ट्रेलियाची चांगलीच दमछाक झाली. सर्व खेळाडू बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाला फक्त २८.२ षटकात २१७ धावाच करता आल्या.
आजच्या या सामन्यात ५ गडी गमावत भारताने ३९९ धाव केल्या. यात श्रेयस अय्यर १०५, शुबमन गिलने १०४ धावा केल्या. तर ऋतुराज गायकवाड ८, इशान किशन ३१, केएल राहुल ५२, रविंद्र जडेजा १३ सुर्यकुमार यादव ७२यांनी धावा केल्या. या सामन्यात सूर्यकुमार यादव याने ४४ व्या ओव्हरमध्ये सलग चार सिक्सर मारुन कांगारुंना धक्का दिला. त्यानंतर बँटींगसाठी आलेल्या कांगारुच्या खेळाडूंना भारतीय गोलंदाजांनी जखडून ठेवले. त्यांना फारशा धावा करता आल्या नाही. या सामन्यात आर. अश्विनने व रवींद्र जडेजाने प्रत्येकी तीन तर प्रसिध कृष्णा दोन विकेट घेतल्या. मोहम्मद शमीने एक विकेट घेतली.
इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये असलेला हा सामना जिंकून भारताने मालिकाही जिंकली. कांगारु पहिल्या सामन्यातील पराभवाचे उ्ट्टे काढण्याची संधी होती.पण, ते अपय़शी ठरले. भारताने धावांचा इतका मोठा डोंगर उभा केल्यामुळे त्यांना तो पार करणे अवघड गेले. हा सामना दुपारी सुरु झाला. त्यात पावसाने दोन वेळ व्यत्यय आणला. पण, पुन्हा हा सामना सुरु झाला. विश्वचषकापूर्वी भारत-ऑस्ट्रेलिया ही मालिका दोन्ही संघासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे आजचा सामना रंगणार असे वाटत असतांना तो एकतर्फी झाला.
२२ सप्टेंबर रोजी झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध एकदिवसीय मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारताने पाच गडी गमावत दणणीत विजय मिळवला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलिया २७७ धावांचे आव्हान दिले होते, हे आव्हान भारताने ४८.४ षटकात पार केले. या सामन्यात २७७ धावांचा पाठलाग करताना ऋतुराज गायकवाड आणि शुभमन गिल यांनी दमदार सुरुवात केली. शुभमन गिलने ६३ बॉलमध्ये ७४ धावा केल्या. तर ऋतुराज गायकवाड ७१ धावा केल्या. के.एल. राहुल ५८, सर्यंकुमार यादव याने ५०, श्रेयस अय्यर ३, इशान किशन १८ धावा केल्या. रविंद्र जडेजा ३ धावा केल्या होत्या. तर मोहम्मद शामीने भेदक मारा करत पाच विकेट घेतल्या आहे. जसप्रीत बुमराह, आर अश्विन,,रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. ऑस्ट्रेलियाकडून डेविड वॉर्नर याने अर्धशतकी खेळी केली. त्याशिवाय जोश इंग्लिश, स्टिव्ह स्मिथ आणि लाबुशेन यांनी महत्वाचे योगदान दिले. त्याशिवाय कर्णधार पॅट कमिन्स याने अखेरीस जबराट फिनिशिंग टच दिला. ऑस्ट्रेलियाने ५० षटकात २७६ धावांपर्यंत मजल मारली होती.
या सीरिजमध्ये तीन सामने होणार असून आज दुसरा सामना आहे तर तिसरा सामना २७ सप्टेंबरला होणार आहे. पहिल्या दोन सामन्याचा संघ व तिस-या सामन्याचा संघ अगोदरच जाहीर करण्यात आला आहे. पहिल्या दोन सामन्यासाठी कॅप्टन आणि विकेटकीपर केएल राहुल आहे. तर उपकर्णदार रवींद्र जडेजा आहे. तिस-या सामन्यासाठी कॅप्टन रोहित शर्मा तर उपकर्णदार हार्दिक पंड्या असणार आहे.
पहिल्या दोन सामन्यासाठी टीम इंडिया केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, इशान किशन (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णा हे संघात आहे.
India’s resounding victory over Australia in the second match as well