शनिवार, ऑक्टोबर 11, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

मुंबई येथे मराठी भाषा भवनासाठी २६० कोटींची तरतूद तर भाषा प्रचार व प्रसारासाठी इतका निधी

जानेवारी 29, 2024 | 11:59 pm
in राज्य
0
Deepak Kesarkar e1706552967221


ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मुंबई येथे मराठी भाषा भवनासाठी २६० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती मराठी भाषा व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सिडको प्रदर्शन केंद्र वाशी येथे आयोजित ‘विश्व मराठी संमेलन २०२४ च्या सांगता समारंभात दिली.

यावेळी नुकतेच पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेले डॉ. झहीर काझी, उदय देशपांडे, पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालेले राम नाईक, राजदत्त, मराठी भाषा विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर-पाटणकर, विजय पाटील, सुप्रिया बडवे, अजय भोसले, डॉ. शामकांत देवरे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मंत्री दीपक केसरकर म्हणाले की, मरीन लाईन्स मुंबई येथे मराठी भाषा भवन करिता २५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. तसेच नवी मुंबई येथे साहित्यिकांच्या राहण्याची व्यवस्था होण्यासाठी महाराष्ट्र भवन उभारण्यात येणार आहे. तर्कतीर्थ पं.लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या कार्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ वाई येथे एक भवन उभारण्यात येणार आहे. मराठी भाषेच्या प्रचार व प्रसारासाठी परदेशातील मराठी माणूस कशा प्रकारे योगदान देऊ शकतो, यासाठी तीन देशांशी करार करण्यात आलेला आहे. मराठी भाषा प्रचार व प्रसारासाठी वर्षाला ५० कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. स्थानिक पातळीवर साहित्य संमेलनाची समिती असावी.

कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीताने झाली. या कार्यक्रमात नुकतेच पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेले डॉ.झहीर काझी, उदय देशपांडे तसेच पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालेले राम नाईक, राजदत्त यांना मराठी भाषा व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. पद्म पुरस्कार जाहीर झालेल्या मान्यवरांनी आपले मनोगतही व्यक्त केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

या विश्व मराठी संमेलन २०२४ चे उद्घाटन राज्यपाल रमेश बैस यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपसभापती डॉ.नीलमताई गोऱ्हे, आमदार गणेश नाईक, आमदार श्रीमती मंदा म्हात्रे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा अप्पर मुख्य सचिव भूषण गगराणी, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर, माजी आयुक्त विजय नाहाटा आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.

या संमेलनात मराठीच्या वैश्विक प्रचारासाठी परिसंवाद, मराठी पुस्तकांचं जग चर्चासत्र, मराठीची सद्य:स्थिती आणि भविष्यकाळ, विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात महाराष्ट्राची गरुडझेप, व्यवहारात मराठीचा वापर आणि अर्थाजर्नाची भाषा, मराठमोळ्या खाद्यपदार्थांची पाककला स्पर्धा, मराठी भाषेचा प्रवास आणि नवी क्षितिजे इत्यादी कार्यक्रम व उपक्रम आयोजित करण्यात आले होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज्यसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात नेमकं काय घडेल…बघा संपूर्ण माहिती

Next Post

राज्यभर आम आदमी पार्टीचा बेरोजगार आक्रोश आंदोलन…

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
rape2
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार…गुन्हा दाखल

ऑक्टोबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

कॉलेजरोड कंपनीचे शोरूम फोडून पावणे सतरा लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

ऑक्टोबर 9, 2025
cbi
संमिश्र वार्ता

लाचखोरी प्रकरणात सीबीआयने मुंबईतील सीजीएसटी अधीक्षक आणि निरीक्षकांना केली अटक

ऑक्टोबर 9, 2025
girish mahajan
महत्त्वाच्या बातम्या

खऱ्या अर्थाने संकटमोचक… हा निर्णय घेणारे गिरीश महाजन राज्यातील पहिलेच मंत्री… अन्य मंत्रीही आदर्श घेणार?

ऑक्टोबर 9, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या ९ ऑक्टोबरचे राशिभविष्य

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
Untitled 184

राज्यभर आम आदमी पार्टीचा बेरोजगार आक्रोश आंदोलन…

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011