मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुका वकील संघाचे सदस्य अॅड.राजाराम जयवंत आढाव व त्यांची पत्नी अॅड. मनिषा राजाराम आढाव या वकील दाम्पत्याचे अपहरण करुन निघृणपणे हत्या करुन त्यांचे मृतदेह विहिरीत फेकण्यात आले आहेत. या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी सोमवारी मनमाड वकील संघाची तातडीची बैठक घेऊन मनमाड न्यायालयाचे एक दिवसाचे कामकाज बंद ठेवण्याचा ठराव सर्वानुमते मंजुर केला,
या बैठकीत वकील संघाचे अध्यक्ष अॅड. किशोर सोनवणे यांनी सदर हत्याकांडाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करताना सांगितले की, वकील हा न्याय व्यवस्थेचा एक महत्वाचा घटक आहे. तरी देखील गेल्या काही वर्षात वकोलांवर हल्ला करणे, हत्या करणे, शिवीगाळ व धमक्या देणे, खोट्या तक्रारी करणे, अशा घटना वारंवार घडत आहे. त्यामुळे अशा घटनापासून वकीलांना संरक्षण मिळणेसाठी महाराष्ट्र शासनाने वकील संरक्षण कायदा तातडीने पारीत केला पाहीजे.
या बैठीकीत माजी अध्यक्ष अॅड.. सुधाकर मोरे, सचिव अॅड. शशिकांत व्यवहारे, अॅड. मनोज मुलचंदानी, अॅड.उल्हास गवांदे, अॅड. हेमंत सोनवणे यांनी देखील सदर दुर्देवी घटनेचा तीव्र शब्दात निषेध करुन त्यांचे मनोगत व्यक्त केले आणि मयत आढाव दाम्पत्यास श्रध्दांजली अर्पित केली.
त्यानंतर मनमाड वकील संघाचे सर्व सदस्यांनी नांदगाव तहसिलदारांचे प्रतिनिधी मनमाडचे मंडल अधिकारी यांच्या कार्यालयात जाऊन महाराष्ट्र शासनाने वकील संरक्षण कायदा तातडीने पारीत करावा या मागणीचे निवेदन दिले.
सदर बैठकीत अॅड. किशोर सोनवणे, अॅड. सुरेश पाटील, अॅड. शशिकांत व्यवहारे, अॅड. सुधाकर मोरे, अॅड. एम.जी. बापट, अॅड. सुमित दंडगव्हाळ, अॅड. दिलीप देसले, अॅड.एस.एस.लांबोळे, अॅड. हेमंत सोनवणे, अॅड. उल्हास गर्वाद, अॅड. मोहन माळवतकर, अॅड. अनिल कुंझरकर, अँड. शेखर महाजन, अँड. आनंदराज पाटील, अॅड. सतीष दुबे, अॅड. वाल्मिक जगताप, अॅड. निलेश केदारे, अॅड. मनोज मुलचंदानी, अॅड. राजेंद्र पालवे, अॅड. सुरेश मल्हारे, अॅड. प्रदीप संसारे, अँड. अमित सोनवणे, अॅड. सुनिल भागवत, अॅड. मुन्नवर पठाण, अॅड. स्वप्निल व्यवहारे, अॅड. के. पी.कुभांरे, अॅड. योगेश मिसर, अॅड. अमोल लहाने, अॅड. संजय गांधी, अॅड. लाजवंती गायकवाड, अॅड. कविता आव्हाड, अॅड. यास्मिन शहा, अॅड. पुजा मल्हारे, इ. सर्व वकील हजर होते.