नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यसभेच्या ५६ जागांसाठी २७ फेब्रुवारीला मतदान होणार असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. या ५६ जागांमध्ये महाराष्ट्रीतील ६ जागांवर निवडणूक होणार आहे. आज निवडणूक आयोगाने या निवडणुकीचा कार्यक्रम घोषीत केल्यानंतर देशभर राजकीय घडामोडीला वेग आला आहे. या ५६ जागेच्या निवडणूका महाराष्ट्रा, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, कर्नाटक, उत्तराखंड, छत्तीसगड, ओदिशा, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश मध्ये रंगणार आहे.
या ५६ खासदारांचा कार्यकाळ हा येत्या २ एप्रिलला संपणार आहे. त्यापूर्वीच या निवडणूका होणार आहे. या निवडणुरीची अधिसूचना 8 फेब्रुवारी ला निघेल. तर अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ही १५ फेब्रुवारी पर्यंत असणार आहे. तसेच अर्जाची छाननी 16 फेब्रुवारी पर्यंत होणार आहे. त्यानंतर अर्ज मागे घेण्याची मुदत ही २० फेब्रुवारी पर्यंत आहे. त्यानंतर २७ फेब्रुवारीला सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेदरम्यान मतदान होणार आहे. तर त्याचदिवशी संध्याकाळी ५ वाजता मतमोजणी केली जाणार आहे.
या निवडणुकांमुळे राज्यसभेवर असलेले अनिल देसाई, केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, परराष्ट्र राज्य मंत्री व्ही. मुरलीधरन, काँग्रेसचे कुमार केतकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वंदना चव्हाण हे खासदार निवृत्त होणार आहे. त्यांना पुन्हा संधी मिळते की नाही हे अद्याप निश्चित नाही.