नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रताप्रकरणी दोन आठवड्यांची मुदतवाढ देत १५ फेब्रुवारीपर्यंत निकाल द्यावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे आता शिवसेना पाठोपाठ राष्ट्रवादीचा निकाल लवकर लागणार आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्हासंबंधीदेखील निवडणूक आयोगाची सुनावणी पूर्ण झाली आहे. त्याबाबत निवडणूक आयोग कधीही निर्णय देऊ शकते. त्यामुळे आगामी लोकसभेत एकुणच अधिकृत पक्ष कोण याबाबत स्पष्टता येवू शकेल. त्यानंतर हा वाद इतक्या पर्यंत संपणार नाही. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात हा वाद पुन्हा जाणारच आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रता सुनावणीसाठी तीन आठवड्यांची वेळ वाढवून मागितली होती; परंतु सर्वोच्च न्यायालयाने दोन आठवड्यांची मुदत वाढवून दिली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट निर्माण झाले. अजित पवार गट सत्तेत सहभागी झाले आहेत, तर पवार गट विरोधात बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणी १५ फेब्रुवारीला निकाल देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्हासंबंधीदेखील निवडणूक आयोगाची सुनावणी पूर्ण झाली आहे. त्याबाबत निवडणूक आयोग कधीही निर्णय देऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना वेळ वाढवून दिल्याने त्यांच्यासाठी मिळालेला वाढीव वेळ खूप महत्त्वाचा आहे. शिवसेनेच्या बाबतीत जसा नार्वेकर यांनी जसा निवडणूक आयोगाच्या निकालाचा आधार घेतला, तसाच आधार आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत निवडणूक आयोगाने निकाल दिला, तर त्याच निर्णयाचा आधार नार्वेकर निर्णय घेऊ शकतात.